News Flash

धुक्यामुळे लोकल गाडय़ांच्या वेळेत बदल

खोपोली, कर्जत, कसाराहून सुटणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकात बदल

लोकलच्या वेळापत्रकात बदल

गेल्या काही दिवसांपासून लोकल गाडय़ांचे वेळापत्रक धुक्यामुळे विस्कळीत होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने खोपोली, कर्जत आणि कसाराहून पहाटेच्या वेळेत सुटणाऱ्या लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल दहा ते पंधरा मिनिटे लवकर सोडण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी स्थानकातही आधीच पोहोचावे लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे धुक्यामुळे लोकल गाडय़ांच्या वेळेत बदल करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. खोपोली, कर्जत, कसारा ते कल्याणपर्यंत मोठय़ा प्रमाणात धुके असते. त्यामुळे येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडय़ा उशिराने धावतात.

दरम्यान, गुरुवारी रात्री मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने कामावरून परतणाऱ्या नोकरवर्गाला मोठा फटका बसला.

कर्जत ते सीएसएमटी लोकलच्या नवीन वेळा

लोकल  सुटणार

कर्जत ते सीएसएमटी     मध्यरात्री २.२५ वा.

कर्जत ते सीएसएमटी     पहाटे ३.३१ वा.

अंबरनाथ ते सीएसएमटी  पहाटे ५.१२ वा.

कर्जत ते सीएसएमटी     पहाटे ४.२७ वा.

कर्जत ते सीएसएमटी     पहाटे ४.३९ वा.

खोपोली ते सीएसएमटी   पहाटे ४.४० वा.

कर्जत ते सीएसएमटी     पहाटे ५.४५ वा.

कसारा ते सीएसएमटी लोकलच्या नवीन वेळा

लोकल  सुटणार

कसारा ते सीएसएमटी    पहाटे ४.१० वा.

कसारा ते सीएसएमटी    पहाटे ४.४५ वा.

कसारा ते सीएसएमटी    पहाटे. ५.५५ वा.

कसारा ते सीएसएमटी    सकाळी ६.३५ वा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 10:57 am

Web Title: mumbai central railway%e2%80%88come up with new winter time table of local trains for better functioning
Next Stories
1 टीव्ही पत्रकार प्रशांत त्रिपाठींचा रिक्षा अपघातात मृत्यू
2 पालिकेत शिवसेना ८५, भाजप ८३
3 आईच्या अंत्यविधीसाठी १५ हजारांचे कर्ज
Just Now!
X