14 October 2019

News Flash

मुंबई पोलीस ई-सायकलवरुन पकडणार चोर, पाकिटमार

मुंबई पोलीस तुम्हाला सायकलवरुन गुन्हेगारांचा पाठलाग करताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण मुंबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच ई-सायकल दाखल होणार आहेत.

मुंबई पोलीस तुम्हाला सायकलवरुन गुन्हेगारांचा पाठलाग करताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण मुंबई पोलिसांच्या ताफ्यात लवकरच ई-सायकल दाखल होणार आहेत. ही ई-सायकल दिसायला सर्वसामान्य सायकलसारखी असली तरी त्यामध्ये काही खास वैशिष्टये आहेत. या ई-सायकलची चाचणी झाली असून पेडल मारल्याशिवायही ही सायकल २५ ते ३० किलोमीटरचे अंतर कापू शकते तसेच या सायकलचा ताशी वेग २५ किलोमीटर आहे.

या सायकलचा कसा वापर करायता त्यासंदर्भात लवकरच पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बॅटरीवर ही सायकल तीन तास चालेल. त्यानंतर तासभराचे चार्जिंग लागेल. मुंबई पोलीस गस्तीसाठी सुद्धा ही सायकल वापरणार आहेत. मुंबईतल्या अरुंद गल्ल्यांमध्ये वाहनांना सहजासहजी प्रवेश करता येत नाही. या सायकलमुळे पोलिसांचे गस्तीचे काम अधिक सोपे होईल.

गस्त घालताना पोलीस सामान्य सायकलसारखा याचा वापर करु शकतात. आणीबाणीच्या प्रसंगात चपळतेने कारवाई करण्यासाठी बॅटरी ऑन करुन वेग वाढवता येईल. अरुंद गल्ल्यांमध्ये चोरांचा पाठलाग करताना ही सायकल खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी बाईकऐवजी ही सायकल देण्यात येईल. बॅटरीवर असताना पेडल मारले तर सायकलचा वेग आणखी वाढेल.

 

First Published on February 9, 2019 2:07 pm

Web Title: mumbai cops to get e cycles