News Flash

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक
(संग्रहित छायाचित्र)

मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप-धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरही आज मेगाब्लॉक घेण्यात येणार असून कुर्ला-वाशी स्थानकादरम्यान अप-डाऊन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते संध्याकाळी ४ वाजून १४ मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. यादरम्यान ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर लोकलसेवा बंद असणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत मेगब्लॉक असणार आहे. यादरम्यान वाशी-पनवेल आणि सीएसएमटी-कुर्ला मार्गावर विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2018 8:42 am

Web Title: mumbai local mega block
Next Stories
1 वेगाच्या नशेचे दोन बळी, तिघे गंभीर
2 प्लास्टिकपेक्षा महापालिकांचे अर्धवट मलनि:सारण प्रकल्प प्रदूषणकारी!
3 ‘मालमत्तेच्या कोणत्याही वादावर निर्णय घेण्याचा अधिकार न्यायालयाला’