रविवारी मध्य रेल्वेवर कल्याण ते विठ्ठलवाडी स्थानकांदरम्यान असलेल्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी कल्याण ते कर्जत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. त्यामुळे लोकल गाडय़ांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडय़ांवरही त्याचा परिणाम होणार आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार नाही,असे मध्ये रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीमदरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वे

  • कधी: रविवार, ८ एप्रिल २०१८, स. १०.३० ते दु. ३.०० वा.
  • कुठे: कल्याण ते कर्जत अप आणि डाऊन मार्ग

परिणाम: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल स. ९.१५ ते दु.१.५३ या वेळेत रद्द राहतील. ठाण्याहून कर्जतसाठी जाणाऱ्या लोकल स.१०.४८ ते दु. १.०६ वेळेत रद्द असतील. अंबरनाथ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाडय़ा स. १०.२५ ते दुपारी १.२५ पर्यंत बंद राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

  • कधी : रविवार, ८ एप्रिल २०१८, स. १०.३५ ते दु. ३.३५
  • कुठे : सांताक्रूझ ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्ग

परिणाम :  सांताक्रूझ ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे माहीम ते सांताक्रूझदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल गाडय़ा धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.

हार्बर मार्ग

  • कधी : रविवार, ८ एप्रिल २०१८, स. ११.१० ते सायं. ४.१०
  • कुठे : कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर

परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.