मुंबई विद्यापिठाच्या कलिना कॅम्पसमध्ये स्वच्छतागृहामध्ये विद्यार्थीनीवर लैगिंग अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थीनीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अज्ञात व्यक्तीने विद्यापीठाच्या स्वच्छातागृहामध्ये लैगिंक अत्याचार केल्याचा दावा तिने केला आहे.
विद्यापीठ रजिस्टर (निबंधक) दिनेश कांबळे म्हणाले की, ‘मुलीने त्या अज्ञात व्यक्तीला प्रतिकार करण्यापूर्वीच अज्ञात व्यक्तीने तेथून पळ काढला. आम्ही त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहे. पण जिथे घटना घडली त्याच्या आजूबाजूला सीसीटिव्ही कॅमेरा नसल्यामुळे त्याला शोधण्यात अडचण होत आहे.’
दिनेश कांबळे पुढे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सध्या सुरु आहे. त्या विद्यार्थीनीने विद्यापीठ महिला विकास मंडळाकडे तक्रार केली आहे. विद्यापीठ महिला विकास मुलीची चौकशी करत आहे. विद्यापीठाने सुरक्षेवर ७० लाख रूपये खर्च केला आहे. महिला विकास मंडळाकडून आलेल्या रिपोर्टनंतर विद्यापीठ योग्य ती कारवाई करेल.