News Flash

पावसाचा धुमाकूळ

शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दिवस उजाडण्यापूर्वीच मुंबई ठप्प झाली होती. 

मुंबईतील अनेक भाग जलमय; उपनगरांतील रस्ते पाण्याखाली; ‘मिठी’ची पातळी वाढली

मुंबई : मुंबईत शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून केवळ पाच तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची अक्षरश: दैना उडवली. मुंबई शहर आणि उपनगरांतील अनेक भाग जलमय झाले. शहर भागापेक्षा उपनगरांत तिप्पट पाऊस पडल्यामुळे पूर्व व पश्चिम उपनगरांतील रस्ते पाण्याखाली गेले. सर्वाधिक पाऊस मिठी नदीच्या परिसरात झाल्यामुळे नदीची पाण्याची पातळी वाढली होती, तर कु र्ला, शीव येथील रेल्वे मार्गावर पाणी साचले होते.

शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दिवस उजाडण्यापूर्वीच मुंबई ठप्प झाली होती. हिंदमाता, गांधी मार्केट, शीव रस्ते क्र. २४, मीलन सबवे हे परिसर नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेलेच, पण त्याचबरोबर शहर भागात दादर टीटी सर्कल, सक्कर पंचायत चौक, वडाळा ब्रिज, संगमनगर, किं ग्ज सर्कल या भागांतही पाणी साचले होते, तर पूर्व उपनगरांत कुर्ला सबवे, पी. एल. लोखंडे मार्ग, मानखुर्द सबवे, आर. सी. एफ. कॉलनी, अणुशक्ती नगर येथील रस्तेही जलमय झाले होते. पश्चिम उपनगरांत ओबेरॉय मॉल, मीलन सबवे, साईनाथ सबवे, अंधेरी मार्के ट, खार स्थानक, शास्त्री नगर, दहिसर सबवे या भागातही पाणी साचले.

कुठे, किती पाऊस?

मुंबईत शुक्रवारी पहाटे चार ते सकाळी ९ वाजेपर्यंत जोरदार पाऊस पडला. त्यातही शहर भागापेक्षा उपनगरांत तिप्पट पाऊस पडला.

 • शहर    ५५.२ मिमी
 • पश्चिम उपनगर  १४३.०० मिमी
 • पूर्व उपनगर १३५.५ मिमी

पाच तासांत सर्वाधिक पाऊस कु ठे?

 •  वांद्रे, सांताक्रू झचा पूर्व (एच ईस्ट) १८६ मिमी
 • चेंबूर (एम पश्चिम)   १७५.५ मिमी
 • अंधेरी, जोगेश्वरी पश्चिम भाग (के  पश्चिम)    १५९.४ मिमी
 • कु र्ला (एल विभाग)  १५९.५ मिमी
 • घाटकोपर, विद्याविहार (एन विभाग)   १५९.०० मिमी
 • गोरेगाव पश्चिम (पी दक्षिण)   १५९.६ मिमी
 • अंधेरी, जोगेश्वरी पूर्व (के  पूर्व) १५५.७ मिमी
 • कांदिवली (आर दक्षिण)   १४८.६ मिमी
 • देवनार, गोवंडी (एम पूर्व)  १४८.१ मिमी
 • मालाड (पी उत्तर) १४१.९ मिमी

मुंबईत पाणी भरू नये म्हणून दरवर्षी नालेसफाई के ली जाते, शंभर टक्के  नालेसफाईचे दावे केले जातात, उपाययोजनांवर कोटय़वधी रुपये खर्च के ले जातात. मात्र तरीही प्रत्येक पावसात मुंबईत पाणी भरतेच. केलेल्या उपाययोजनांचे काय झाले? हे पैसे केवळ कंत्राटदाराचे खिसे भरण्यासाठी खर्च झाले का?

– रवी राजा, विरोधी पक्ष नेते, मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:44 am

Web Title: mumbai waterlogged suburban roads under water mumbai ssh 93
Next Stories
1 रेल्वे सेवा ठप्प
2 नदीपात्रात भराव, भिंती बांधल्याने पूरस्थिती
3 विशेष श्रेणीतील उत्तीर्णाचे प्रमाण कायम
Just Now!
X