आरे येथील वृक्षतोडीला शुक्रवारी रात्री सुरुवात करण्यात आली. ज्यानंतर पर्यावरण प्रेमींनी या प्रकाराला विरोध दर्शवत आरे बचाव आंदोलन सुरु केलं. प्रशासन विरुद्ध पर्यावरणप्रेमी हा लढा उभा राहिला. आता या प्रकरणी 29 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. एका रात्रीत 400 पेक्षा जास्त झाडं तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि मुंबईकरांचा संताप उफाळून आला. अनेकजण आरेसाठी पुढे सरसावले आता पोलिसांनी या प्रकरणात 29 जणांना अटक केली.

या सगळ्यांना बोरीवली न्यायालयापुढे हजरही करण्यात आले. ज्यानंतर सगळ्या आंदोलकांना बोरीवली कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आरे परिसरात कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले आहे.

 

अटक करण्यात आलेल्या आंदोलकांची नावं

1) कपिलदीप अग्रवाल
2) श्रीधर ए
3) संदीप परब
4) मनोज कुमार रेड्डी
5) विनीत विचारे
6) दिव्यांग पोतदार
7) सिद्धार्थ सपकाळे
8) विजयकुमार कांबळे
9) कमलेश शांमतिला
10) नेल्सन लोपेश
11) आदित्य पवार
12) ड्वॅन लासार्डो
13) रुहान आलेक्सझांडर
14) मयुर आंग्रे
15) सागर गावडे
16) मनन देसाई
17) स्टीफन मिसाळ
18) स्वप्नील पवार
19) विनेश घोसाळकर
20) प्रशांत कांबळे
21) शशिकांत सोनवणे
22) आकाश पाटणकर
23) सिद्धार्थ ए
24) सिद्धेश घोसाळकर
25)श्रुती माधवन
26) मिमांसा सिंग
27) स्वप्ना स्वर
28) सोनाली निमले
29) प्रमिला भोईर

आरेमधील वृक्षतोड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना सगळ्यांनीच रोष व्यक्त केला आहे. हे सरकार किती आरेरावी करणार असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. तर आरे संदर्भात स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आपण आपली भूमिका मांडू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर पडणारं प्रत्येक झाड त्यांचा म्हणजेच सत्ताधारी पक्षाचा आमदार पाडणार अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. आता या प्रकरणात 29 आंदोलकांना अटक करण्यात आली असून या प्रकरणी न्यायालयाने या सगळ्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.