मुकेश अंबानी प्रकरणाला रविवारी वेगळेच वळण मिळालं. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनाच या प्रकरणात अटक केली. जिलेटीनच्या स्फोटकं कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क करण्यात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यानंतर आता स्कॉर्पिओ कारबरोबर दिसलेली इनोव्हा कारही सापडली आहे. महत्त्वाचं म्हणजे ही कार मुंबई पोलिसांचीच असल्याचं समोर आलं आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गुरुवारी (२५ फेब्रवारी) मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी स्कॉर्पिओ कार बेवारस अवस्थेत सोडली होती. या कारमध्ये सुमारे अडीच किलो वजनाच्या जिलेटीनच्या कांड्या आढळून आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. ‘मुंबई इंडियन्स’ लिहिलेल्या बॅगेत अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारी चिठ्ठीही सापडली. या संपूर्ण प्रकरणात स्कॉर्पिओसह इनोव्हा कार सहभागी होती. यापैकी स्कॉर्पियो कार १७ फेब्रुवारीच्या रात्री मुलुंड उड्डाणपुलाजवळून(ऐरोलीकडे जाणाऱ्या मार्गावरील) चोरण्यात आली. तर इनोव्हा कारवरील नोंदणी क्रमांक बनावट असल्याचे स्पष्ट झाले होतं. दरम्यान ही इनोव्हा कार सापडली असून, शनिवारी रात्री एनआयएच्या कार्यालयात आणण्यात आली.

MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Prime Minister Narendra Modi statement on terrorists
दहशतवाद्यांचा त्यांच्या भूमीतच खातमा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
gangster mukhtar ansari family
स्वातंत्र्यसैनिक ते कुख्यात गुंड; एका कुटुंबाचा सुरस व चमत्कारिक प्रवास

स्कॉर्पिओ गाडीबरोबर एक इनोव्हा कार होती. ज्यातून स्कॉर्पिओ गाडीचा चालक फरार झाला होता. मुंबईतील मुलुंड टोल नाक्यावर या गाडीत दोन व्यक्ती दिसून आले होते. स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन असल्याचं समोर आलं होतं. तर इनोव्हा कारच्या मालकाचा शोध घेतला जात होता. मात्र, आता ही कार सापडली असून, मुंबई पोलीस गुन्हे शाखेचीच ही गाडी असल्याचं समोर आलं आहे.

८०० सीसीटीव्ही फुटेज आणि ३० जणांचे जबाब

तपास सुरू केल्यानंतर पोलिसांकडून पांढऱ्या इनोव्हाबद्दल माहिती काढण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. इनोव्हाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आहे. त्याचबरोबर ३० पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवले होते. तरीही पांढऱ्या इनोव्हाबद्दल कोणतीही माहिती मिळाली नव्हती.