News Flash

नायर रुग्णालय देशात पाचवे

नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव करण्यात आला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

राष्ट्रीय स्तरांवरील सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयाच्या यादीत समावेश

मुंबई : देशभरातील सर्वात जुन्या दंत महाविद्यालयांच्या पंक्तीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईतील नायर दंत महाविद्यालयाला विविध तीन राष्ट्रीय स्तरांवरील सर्वेक्षणात मानाचे स्थान मिळाले आहे. नायर दंत महाविद्यालय व रुग्णालयाने देशातील सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांच्या यादीत पाचव्या, सार्वजनिक दंत महाविद्यालयांच्या यादीत तिसऱ्या, तर अन्य एका सर्वेक्षणात सहावा क्रमांक पटकावला आहे.

नायर दंत महाविद्यालयामध्ये पाच वर्षीय पदवी अभ्यासक्रम, तर तीन वर्षीय पदव्युत्तर दंत वैद्यकीय अभ्यासक्रमास साधारण ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता वाढविण्यास नुकतीच परवानगी मिळाली असून ती आता ६० वरून ७५ इतकी झाली आहे.

तसेच पदव्युत्तर प्रवेश क्षमता २४ वरून २५ इतकी झाली आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आजघडीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नामवंत दंतवैद्यक म्हणून कार्यरत आहेत. तसेच २४ तास तातडीचा दंत दवाखाना संचालित करणारे देशातील हे एकमेव दंत महाविद्यालय व रुग्णालय आहे.

देशभरातील शासकीय आणि खासगी क्षेत्रातील दंत महाविद्यालय व रुग्णालय यांच्या शैक्षणिक कामगिरीसह विविध स्तरीय मूल्यमापन करून त्यातून सर्वोत्कृष्ट दंत महाविद्यालयांची निवड करण्यासाठी यंदा तीन वेगवेगळी सर्वेक्षणे करण्यात आली. त्यात नायर दंत महाविद्यालयाचा गुणगौरव करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेली ही सर्वेक्षणे तीन नामांकित साप्ताहिकांच्या पुढाकाराने करण्यात आली.

या सर्वेक्षणासाठी देशातील दंत महाविद्यालयांची सर्वंकष माहिती, बहुस्तरीय कामगिरी, उपलब्ध पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा आणि त्यांची गुणवत्ता, दंत वैद्यकीय शिक्षणातील वैविध्य, संस्थेकडून आयोजित केले जाणारे उपक्रम, संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित प्रबंध व निबंध, शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यथ्र्यांना मिळणाऱ्या व्यावसायिक संधी अशा वेगवेगळ्या निकषांचा विचार करून हे मूल्यांकन करण्यात आले.

‘द वीक’ साप्ताहिकाने देशपातळीवरील केलेल्या सार्वजनिक व खासगी क्षेत्रांतील दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीच्या सर्वेक्षणात नायर दंत वैद्यकीय महाविद्यालयाला पाचवा क्रमांक बहाल करण्यात आला आहे. ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाने केलेल्या दंत महाविद्यालय व रुग्णालयांच्या सर्वस्तरीय सर्वेक्षणात नायर दंत महाविद्यालयाने देशभरात सहावा क्रमांक पटकावला आहे. ‘आउटलुक’ने केलेल्या देशभरातील सार्वजनिक आणि खासगी अशा निवडक दंत वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामगिरीच्या मूल्यमापनविषयक सर्वेक्षणात नायर दंत वैद्यकीय महाविद्यलयाने शासकीय महाविद्यलय गटामध्ये तिसरे स्थान पटकाविले आहे.

दरवर्षी साडेतीन लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा

मुंबई सेंट्रल परिसरात १९३३ मध्ये नायर दंत महाविद्यालय आणि रुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती. येत्या १८ डिसेंबर रोजी ८७ व्या वर्षात पदार्पण करत असलेले हे रुग्णालय देशातील सर्वात जुने असे दुसऱ्या क्रमांकाचे दंत रुग्णालय व महाविद्यालय आहे. दरवर्षी सुमारे साडेतीन लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या या रुग्णालयात नऊ ‘सुपरस्पेशालिटी’ विभागांसह विविध अत्याधुनिक सेवा-सुविधांचा समावेश आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्रादे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2020 1:59 am

Web Title: nair hospital fifth in the country akp 94
Next Stories
1 वरवरा राव यांचा जामीन लांबणीवर
2 पक्षी हे संपन्न निसर्गाचे द्योतक!
3 ‘येस बँक’प्रकरणी राणा कपूर यांच्या मुलीला जामीन
Just Now!
X