News Flash

‘उद्धव ठाकरेंना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा, पण सेनेचे देव तर बाळासाहेब’

राम मंदिर बांधणं शक्य होतं तर मागील चार वर्षात का बांधण्यात आलं नाही असाही प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला

संग्रहित छायाचित्र

उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यासाठी जाणार आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत मात्र शिवसेनेचे देव तर बाळासाहेब ठाकरे आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मारकाकडे लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. विकासाचा मुद्दा अंगाशी आला त्यामुळे राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जातो आहे अशीही टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे. राम मंदिराचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तसे असताना त्यावर राजकारण होणे गैर आहे तुमचा न्याय देवतेवर विश्वास नाही असेच वाटते आहे असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान जर राम मंदिर बांधणं शक्य होतं तर मागील चार वर्षात का बांधण्यात आलं नाही असाही प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेला डबल ढोलकी वाजवता येणार नाही, सत्तेत राहून विरोधकांची जागा घ्यायची नाही. सत्ता सोडून मैदानाता या असंही आवाहन भुजबळ यांनी केलं.

याआधी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या राम मंदिर दौऱ्यावर टीका केली. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे आणि यांना मंदिर आठवतं आहे असा टोला राज ठाकरेंनी लगावला होता. तसेच शिवसेनेची भूमिका नाटकी असल्याचीही टीका त्यांनी केली. आता छगन भुजबळ यांनीही राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंवर शरसंधान केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2018 4:45 pm

Web Title: ncp leader chagan bhujbal commented on shivsena in ram mandir issue
Next Stories
1 भंडारा जिल्ह्यात जीपचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
2 राज्यात 24962 मेगावॅट विजेच्या मागणीचा विक्रम
3 राज्य सरकारकडून 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा
Just Now!
X