सांडपाणी प्रकिया केंद्र कार्यान्वित झाल्याशिवाय अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली भागात यापुढे एकही नवा उद्योग उभा राहू शकणार नाही.  राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळास या संदर्भातील आदेश दिला आहे. डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथ परिसरात अनेक औद्योगिक कंपन्या आहेत. मात्र सांडपाण्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न या कंपन्यांनी सोडविलेला नाही. त्यामुळेच राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाला आदेश देताना डोंबिवली एमआयडीसीला ३० कोटी रुपये आणि अंबरनाथ एमआयडीसीला १५ कोटी रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय जुन्या उद्योगांचा विस्तार करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्याशिवाय या भागात नवीन उद्योगाला परवानही देऊ नयेत असे आदेश मंडळाला दिले आहेत.