नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने नवी मुंबईतील विमानतळासाठी सुधारित निविदा मसुदा मंजूर केल्याने आता हा प्रकल्प राबवणाऱ्या ‘सिडको’ने प्रकल्पासाठी इच्छुक कंपन्यांकडून मागवण्यात येत असलेल्या पात्रतेसाठी विनंतीअर्ज दाखल करण्याची मुदत दोन सप्टेंबपर्यंत वाढवली आहे.
यापूर्वी हे अर्ज दाखल करण्याची मुदत १८ जून अशी होती. पण मागच्या आठवडय़ात ‘सिडको’ने नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपथी राजू यांच्यासमोर नवीन निविदा मसुदा सादर केला. त्यास मंजुरीही मिळाली. आता त्यानुसार अर्ज दाखल करण्याची संधी इच्छुक कंपन्यांना मिळणार
आहे.