फोन लागत नाही, इंटरनेट सुविधा मिळत नाही म्हणून वापरकर्ते अनेकदा मोबाइल नेटवर्क कंपन्यांच्या नावाने ओरडत असतो. पण त्याची रितसर तक्रार करावयाची म्हटले तरी ती प्रक्रिया सोपी नसल्याने अनेकदा ग्राहक या भानगडीत पडत नाहीत. पण आता ग्राहक या संदर्भातील तक्रार आपण थेट ‘टेलिकॉम नियामक प्राधिकार’ (ट्राय)कडे करता येणार आहे.
ग्राहकांना तक्रारींसाठी सोपे माध्यम उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ट्रायने http://www.tccms.gov.in/ हे संकेतस्थळ सुरू केले असून त्याचे अॅपही बाजारात आणले आहेत. यामुळे मोबाइल ग्राहक तातडीने तेथे दिलेल्या पर्यायाच्या मदतीने तक्रार नोंदवू शकतो. इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढता वापर लक्षात घेता ट्रायने हे पाऊल उचलले असल्याचे ट्रायचे सचिव सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केले. सध्याच्या नियमांनुसार ट्राय टेलिकॉम कंपनीला ५० हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची कारवाई करू शकते. जर मोबाइल कंपनीने तीच चूक पुन्हा केली तर हा दंड एक लाख रुपयांपर्यत वाढू शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2015 रोजी प्रकाशित
मोबाइल नेटवर्कची तक्रार आता थेट ट्रायकडे
फोन लागत नाही, इंटरनेट सुविधा मिळत नाही म्हणून वापरकर्ते अनेकदा मोबाइल नेटवर्क कंपन्यांच्या नावाने ओरडत असतो.
First published on: 28-01-2015 at 12:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now telecom consumer complaints about mobile network to trai