मुख्यमंत्री बदलाची चर्चा फक्त राजकीय वर्तुळात नाही तर भाजपामध्येही सुरु आहे असा दावा करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना भाजपाने उत्तर दिले आहे. भाजपामध्ये सर्व निर्णय सामूहिक होतात. मुख्यमंत्री बदलाची इथे कोणतीही चर्चा नाही असे सांगून राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राऊत यांच्या दावा फेटाळून लावला.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा मुख्यमंत्री बदलण्याचे कारणच काय ? असा सवाल करत या चर्चांना पूर्णविराम दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माझ्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची जास्त तडफड आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. राज्यात नेतृत्व बदलाची गरज नसून मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री प्रामाणिक प्रयत्न करत आहे. कोणाची तरी दुकाने बंद केली म्हणून हे असले चर्चेचे उपद्व्याप सुरु असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्यात नेतृत्व बदलाची गरज नसून मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री प्रामाणिक प्रयत्न करत आहे. ब्राह्मण मुख्यमंत्री नको, असं कोणाच्याच मनात नाही. कोणाची तरी दुकाने बंद केली म्हणून असले चर्चेचे उपद्व्याप सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.

सध्या राज्यात चिंताजनक परिस्थिती असून राज्यात नेतृत्व बदलण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घ्यावा. मुख्यमंत्री बदलाची चर्चा फक्त राजकीय वर्तुळात नाही तर भाजपामध्येही सुरु आहे असे संजय राऊत म्हणाले होते.