मुंबईकरांच्या खिशाला खार लावणाऱ्या वाहनतळ शुल्कवाढीचा प्रस्ताव सत्ताधारी युतीने चर्चेविनाच मंजूर केला. या मुद्दय़ावर अनेक नगरसेवकांना मत मांडायचे होते. मात्र, महापौर स्नेहल आंबेकर यांनी कोणालाही बोलण्याची संधी दिली नाही. त्यामुळे  संतप्त झालेल्या विरोधकांनी प्रस्तावाच्या प्रती हवेत उडवून सभात्याग केला.mu17mu18