News Flash

जामिनासाठी पंकज भुजबळ न्यायालयात

आíथक गुन्हे शाखेने तपास करून पनवेल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

आमदार पंकज भुजबळ यांनी अटकपूर्व जामिनासाठी अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल एका फसवणुकीच्या प्रकरणात ते सहआरोपी आहेत. भुजबळ यांच्या वतीने फौजदारी वकील विलास नाईक यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून येत्या बुधवारी यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

पनवेल तालुक्यातील रोिहजण येथील २५ एकर जागेत २३४४ निवासी घरे बांधण्याचा  प्रकल्प देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीतर्फे सुरू करण्यात आला आहे. त्यात गुंतवणूकदारांची ४४ कोटींची फसवणूक झाली असल्याची फिर्याद मोहमद युनूस शेख यांनी १३ जून २०१५ रोजी केली होती. आíथक गुन्हे शाखेने तपास करून पनवेल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2016 3:50 am

Web Title: pankaj bhujbal in court for bail
टॅग : Pankaj Bhujbal
Next Stories
1 संपाबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे ‘मार्ड’ला आदेश – उच्च न्यायालय
2 २५ पोलीस ठाण्यांत ३० एप्रिलपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
3 न्यायालयाचे राज्य सरकारवर काव्यात्मक ताशेरे!
Just Now!
X