लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पवन एक्स्प्रेसचे इंजिन अवरोधक भेदून थेट प्लॅटफॉर्मवर चढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या दुर्घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सोमवारी पहाटे चारच्या सुमारास पवन एक्स्प्रेसचे इंजिन अवरोधक भेदून प्लॅटफॉर्मवर चढल्याची घटना घडली. यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसमधून सुटणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे समजते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेवर मध्य रेल्वेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी चर्चगेट स्टेशनवरही लोकल ट्रेन बफर तोडून थेट प्लॅटफॉर्मवर चढली होती. यात मोटरमनसह पाच प्रवासी जखमी झाले होते. लोकमान्य टिळक टर्मिनसमधील सोमवारी पहाटे घडलेल्या घटनेमुळे चर्चगेट स्टेशनवरील घटनेची आठवण झाली.