News Flash

वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात २२ ‘पोर्टेबल व्हीएमएस’

अपघात, नैसर्गिक आपत्ती किं वा अन्य कोणत्याही निमित्ताने वाहतुकीचा मार्ग बंद झाल्यास नियंत्रण कक्षातून एक कळ दाबताच मार्गबदल, वाहनांना महत्त्वाच्या सूचना देणारी अद्ययावत पोर्टेबल व्हीएमएस

पोर्टेबल व्हीएमएस यंत्रांमुळे वाहनचालकांना क्षणार्धात मार्ग बदल सुचवणे शक्य आहे.

लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : अपघात, नैसर्गिक आपत्ती किं वा अन्य कोणत्याही निमित्ताने वाहतुकीचा मार्ग बंद झाल्यास नियंत्रण कक्षातून एक कळ दाबताच मार्गबदल, वाहनांना महत्त्वाच्या सूचना देणारी अद्ययावत पोर्टेबल व्हीएमएस (व्हेरिएबल मेसेजिंग सिस्टीम) यंत्रे वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाली आहेत.

पावसाळ्यात शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचते आणि वाहतुकीचा खोळंबा होतो. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पेडर रोड येथे दरड कोसळली. अशीच घटना कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती मार्गावरही घडली. त्यामुळे हे मार्ग वाहतुकीसाठी बंद के ले गेले. एखादा मार्ग खचून अचानक मोठा खड्डा पडतो. काही मार्गावर मेट्रोप्रमाणे विकासकामे सुरू होतात. रस्त्याची रुंदी कमी होते आणि वाहतूककोंडी होते. पूर्व मुक्त मार्ग, सागरी सेतूप्रमाणे मोठय़ा प्रमाणात रहदारी असलेल्या मार्गावर किं वा एखाद्या उड्डाणपुलावर घाईच्या वेळेत अपघात झाल्यास वाहतूक कोंडी होते. अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस मार्गबदल करतात, पर्यायी मार्ग वाहनचालकांना सुचवतात. आतापर्यंत माध्यमे, समाजमाध्यमांवरून हे बदल सुचवले जात होते. वाहनचालकांना सूचना देण्यासाठी त्या त्या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात के ले जात होते. या प्रक्रियेत वेळ आणि मनुष्यबळ खर्ची पडत होते. आता पोर्टेबल व्हीएमएस यंत्रांमुळे वाहनचालकांना क्षणार्धात मार्ग बदल सुचवणे शक्य आहे.

या यंत्रांचा आवश्यकतेनुसार वापर करणे शक्य आहे. उदाहरणार्थ सण-उत्सव, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, अपघात, नैसर्गिक आपत्ती यापैकी कोणत्याही परिस्थितीत मार्गबदल, पर्यायी मार्गासह महत्त्वाच्या सूचना वाहनचालकांना या यंत्राद्वारे देता येतील. उर्वरित वेळेत वाहतुकीच्या नियमांसह अन्य सामाजिक विषयांवरील जनजागृती करणेही शक्य होईल, असे वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त नंदकु मार ठाकू र यांनी सांगितले. या यंत्रांमुळे वाहनचालकांना मनुष्यबळ खर्ची न घालता त्वरित सूचना देता येतील, असेही त्यांनी सांगितले.

शहरात महापालिकेसह अन्य यंत्रणांकडे व्हीएमएस आहेत. मात्र ते एकाच जागी स्थिर असून आवश्यकतेनुसार अन्य ठिकाणी नेणे शक्य नाही. वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात दाखल झालेली व्हीएमएस यंत्रे ट्रॉलीवर असून ती सहजरीत्या गरजेनुसार अन्यत्र घेऊन जाणे शक्य आहे. यंत्राला वायफाय, इंटरनेट जोडणी असल्याने त्यावरील सूचना नियंत्रण कक्षातून देणे सहज शक्य आहे. हे यंत्र सौरऊर्जेवर चालते. शिवाय चार्जही करता येते. मुसळधार पाऊस, धुक्यात किंवा प्रखर उन्हातही व्हीएमएस यंत्राच्या पटलावरील (स्क्रीन) सूचना वाहनचालकांना दुरूनही स्पष्ट दिसू शकतील, असा दावा वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 1:02 am

Web Title: portable vms in traffic police convoy dd 70
Next Stories
1 प्रवाशांसाठी सीएसएमटीत दिशादर्शक फलक
2 आरोग्य विभागाच्या ७५ ग्रामीण रुग्णालयांत डायलिसिस सेवा!
3 नागरिकांना लस निवडीचे स्वातंत्र्य देण्याची मागणी
Just Now!
X