13 July 2020

News Flash

नवी मुंबई, पुण्यासह सात शहरांची वीजपुरवठा यंत्रणा सुधारणार

नवी मुंबई, पुणे, नाशिक, ओझर, सिन्नर, कोल्हापूर आणि पनवेल या सात शहरांमधील विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा सुधारण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या

| November 21, 2013 02:28 am

नवी मुंबई, पुणे, नाशिक, ओझर, सिन्नर, कोल्हापूर आणि पनवेल या सात शहरांमधील विद्युत पुरवठा करणारी यंत्रणा सुधारण्यासाठी १८०० कोटी रुपयांच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, यापैकी ३०० कोटी शासनाच्या तिजोरीतून दिले जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या योजनेतून या सात शहरांतील विद्युत पुरवठा सुधारण्याची योजना होती. पण या शहरांमध्ये १५ टक्क्यांपेक्षा कमी विजेची हानी असल्याने केंद्राने या सात शहरांना आर्थिक मदत करण्यास नकार दिला. परिणामी राज्य शासनाच्या माध्यमातून आता सुधारणा करण्यात येणार आहे. या सातही शहरांमध्ये नवीन विद्युत केंद्रे उभारणे, उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, भूमिगत वाहिन्या टाकणे आदी कामे केली जाणार आहेत. राज्य शासनाने ३००कोटी रुपये देण्याचे मान्य केले असून, उर्वरित रक्कम कर्जरुपाने उभी केली जाणार आहे. चार वर्षांंत हे काम पूर्ण केले जाणार असले तरी २००१५ अखेरीस या सातही शहरांमधील नागरिकांना चांगली सेवा मिळू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2013 2:28 am

Web Title: power system will upgrade in navi mumbai pune and 7 more city
टॅग Electricity,Power
Next Stories
1 दोन लाचखोरी प्रकरणी तिघांना अटक
2 काँग्रेसला न्यायालयाचा जोरदार झटका
3 अभिनेत्री श्रुती हसनवर घरात घुसून हल्ल्याचा प्रयत्न!
Just Now!
X