खासगी रुग्णालयांकडून उपलब्ध खाटांची माहिती देण्यास टाळाटाळ

तबस्सुम बारनगरवाला, एक्स्प्रेस वृत्त

मुंबई : मुंबई महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून पुरेशा खाटा उपलब्ध असतानाही के वळ रिकाम्या खाटांची माहिती उपलब्ध नसल्याने रुग्णांना वणवण करावी लागते आहे. कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्याला कोविड समर्पित आरोग्य केंद्रामध्ये दाखल करावे, असे मुंबई महानगरपालिके चे निर्देश आहेत. मात्र, या निर्देशांचे पालन होत नसल्याने गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांना खाटांसाठी प्रतीक्षा करावी लागते आहे.

अतिधोकादायक मध्यम लक्षणे, गंभीर स्थिती, अतिदक्षता किं वा कृत्रिम श्वसनयंत्रणेची गरज असणाऱ्या रुग्णांवर कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये उपचार के ले जातात. सरकारी आणि खासगी रुग्णालयांत यासाठी एकूण ५ हजार २०० खाटा उपलब्ध आहेत. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार १७ मेपर्यंत १८ हजार ५५५ रुग्णांची नोंद मुंबईत झाली. त्यापैकी लक्षणे आढळलेल्या आणि गंभीर स्थितीत असलेल्या रुग्णांचे प्रमाण ३० टक्के  आहे. यानुसार साडेपाच हजारांहून अधिक रुग्णांना कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये दाखल के ले आहे. मात्र नोंद झालेल्या एकू ण रुग्णांपैकी बरेच रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या १३ हजारांच्या आसपास आहे. त्यापैकी ३० टक्के म्हणजेच जवळ जवळ चार हजार रुग्णांना कोविड समर्पित रुग्णालये आणि आरोग्य के ंद्रांमध्ये दाखल के ले आहे. ही संख्या उपलब्ध खाटांपेक्षा किती तरी कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त खाटा नव्या रुग्णांसाठी उपलब्ध होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही.

‘सरकारी रुग्णालये पालिके चे निर्देश पाळत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये मात्र रुग्णांची प्रकृती बराच काळ स्थिर असूनही चाचणी नकारात्मक येऊन तो घरी जाईपर्यंत त्याला कोविड समर्पित रुग्णालयातच ठेवले जाते,’ असे एका पालिका साहाय्यक आयुक्तांनी सांगितले. ‘काही रुग्णांची प्रकृती स्थिर असली तरीही त्यांना मूत्रपिंडाचा आजार किं वा कर्क रोग असतो. त्यांची प्रकृती कधीही गंभीर होऊ शकते. त्यामुळे त्यांना आरोग्य के ंद्रात पाठवायचे की नाही याबाबतचा निर्णय त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच घ्यावा लागतो,’ असे के ईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांचे म्हणणे आहे. ‘करोना समर्पित रुग्णालयातील ९५ ते ९७ टक्के खाटा भरल्या आहेत. त्यामुळे येथे रिकाम्या होणाऱ्या खाटांची माहिती रुग्णालयांनी  पालिके च्या आपत्कालीन विभागाला १९१६ या क्रमांकावर कळवणे आवश्यक आहे,’ असे पालिके च्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले. मात्र असे होत नसल्याने रुग्णांना खाट मिळण्यात अडचणी येत आहेत.

खाटांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न

पालिके च्या विशेष अधिकोरी मनीषा म्हैसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार करोनाबाधितांचा ८० टक्के भार सरकारी रुग्णालयांवरच आहे. त्यामुळे खासगी आणि सरकारी अशा दोन्ही ठिकाणी खाटांची संख्या ६ हजारांवर नेण्याचा पालिके चा प्रयत्न आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खासगी रुग्णालयांना ६० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यास सांगितले आहे. शिवाय कोविड दक्षता केंद्र – २ येथेही अतिदक्षता विभागाची सेवा पुरवली जाणार आहे.

करोनाबाधितांचे वर्गीकरण असे

’ करोनाबाधिताच्या थेट संपर्कोत आल्याने अतिधोकादायक बनलेल्या आणि दाटीवाटीच्या वस्तीतील घरांमुळे सुरक्षित वावराचे नियम पाळू न शकणाऱ्या व्यक्तींचे कोविड दक्षता केंद्र -१ मध्ये विलगीकरण के ले जाते. तेथे २२ हजार ९४१ खाटा उपलब्ध आहेत.

’ लक्षणे नसलेल्या किं वा सौम्य लक्षणे असलेल्या बाधितांना कोविड दक्षता के ंद्र-२ मध्ये दाखल के ले जाते. येथे ३४ हजार ३२९ खाटा उपलब्ध आहेत.

’ सौम्य लक्षणांसह इतर आजार असणाऱ्या आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड समर्पित आरोग्य के ंद्रांमध्ये ठेवले जाते.

’ अतिधोकादायक मध्यम लक्षणे, गंभीर स्थिती, अतिदक्षता किं वा कृत्रिम श्वसनयंत्रणेची गरज असणाऱ्या रुग्णांवर कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये उपचार के ले जातात. सरकारी आणि खासगी रुग्णालयांत यासाठी एकूण ५ हजार २०० खाटा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.