चोरोंको सब नजर आते है चोर अशा शब्‍दात भाजपा अध्‍यक्ष आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. माध्यमांशी बोलताना म्‍हणाले की, भाजप सरकारच्‍या बदनामीचे षडयंत्र काँग्रेसने असेच सुरू ठेवले तर आम्‍ही जशास तसे उत्‍तर देऊ. राहुल गांधी यांचा खोटारडेपणा आता देशाच्‍या जनतेसमोर उघड झाला असून त्‍यांनी या देशातील जनतेची जी दिशाभूल केली त्‍या प्रकरणी माफी मागावी. राफेल हा विषय देशाच्‍या सुरक्षेशी जोडलेला आहे त्‍यामुळे या विषयाचा असा खेळ मांडणा-या काँग्रेसला चोरोंको सब नजर आते हैं चोर अशी अवस्‍था झाली आहे अशा शब्‍दात त्‍यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला.

राफेल प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍टता केल्‍यानंतरही काँग्रेसचे अध्‍यक्ष खा. राहुल गांधी वारंवार भाजप सरकारवर खोटे, बिनबुडाचे, अतार्किक, आरोप करीत असल्‍याच्‍या निषेधार्थ आज मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार  आशिष शेलार यांच्‍या निर्देशानुसार मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर भाजपाच्‍या हजारो कार्यकर्त्‍यांनी तीव्र निदर्शेने केली. तर आशिष शेलार यांनी याबाबतचे राष्‍ट्रपतींना द्यावयाचे निवेदन मुंबई उपनगर जिल्‍हाधिकारी सचिन कुर्वे यांच्‍याकडे सुपुर्द केले.

या निवेदानामध्‍ये काँग्रेसरकडून राफेल प्रकरणी वारंवार खोटे आरोप करण्‍यात येत असल्‍याचा सविस्‍तर उहापोह करण्‍यात आला आहे. देशाच्‍या सुरक्षेच्‍या दुष्‍टीने हा विषय महत्‍वाचा असतानाही असेच न्‍यायालयाने त्‍यामध्‍ये स्‍पष्‍टता आणल्‍यानंतरही खा. राहुल गांधी हे देशातील जनेतेची दिशाभूल करीत आहेत. देशाच्‍या सुरक्षेबाबत हा त्‍यांनी जो खेळ सुरू केला आहे ही बाब चिंतेची असून या प्रकरणी राष्‍ट्रपतींनी दखल घेऊन योग्‍य ती कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात करण्‍यात आली आहे.

राहुल गांधी माफी मागो… राहुल गांधी शर्म करो.. ! सुप्रिम कोर्ट के निर्णय का कमाल.. राहुल का राफेल झूठ हुवा बेहाल..! राहुल का झूठ हारा राफेल का सच जीता! तसेच राहुल गांधी हाय.. हाय..! अशा घोषणा देत भाजपाच्‍या हजारो कार्यकर्त्‍यांनी कॉंग्रेसच्‍या मुंबईतील दोन्‍ही कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून आपला निषेध नोंदवला.