07 July 2020

News Flash

मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने हार्बर विस्कळीत

कुर्ला आणि चुनाभट्टी दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने हार्बर मार्गावरील दोन्ही दिशेची उपनगरी वाहतूक सोमवारी सकाळी तब्बल दीड तास ठप्प झाली होती.

| October 16, 2012 08:26 am

कुर्ला आणि चुनाभट्टी दरम्यान मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने हार्बर मार्गावरील दोन्ही दिशेची उपनगरी वाहतूक सोमवारी सकाळी तब्बल दीड तास ठप्प झाली होती.
मुंबई पोर्ट ट्रस्टमधून कोळसा घेऊन डहाणू येथील विद्युत केंद्राकडे निघालेल्या मालगाडीचे इंजिन पहाटे साडेपाचच्या सुमारास सांधा बदलत असताना अचानक जागीच थांबले. कुर्ला आणि चुनाभट्टीच्या दरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गाच्या मध्येच ही मालगाडी उभी असल्याने दोन्ही दिशेची वाहतूक बंद पडली. गाडय़ा कशामुळे बंद आहेत, हे न कळल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांनी मार्गातच थांबलेल्या गाडय़ांमधून खाली उतरून कुर्ला स्थानकाकडे पायी जाणे पसंत केले. कुर्ला स्थानकात सव्वासहा वाजल्यानंतर प्रवाशांना मेन लाइनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात येत होते. सात वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या इंजिनाच्या साहाय्याने मालगाडी हलविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरू झाली.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2012 8:26 am

Web Title: railway engine fail harbour disturbe
टॅग Harbour,Railway
Next Stories
1 १५ डब्यांची लोकल आजपासून
2 मुंबईतील उन्नत रेल्वे मार्गाच्या प्रकल्पांसाठी अधिकाऱ्यांचा उच्चस्तरीय गट स्थापणार
3 ‘कोमसाप’च्या संमेलनाध्यक्षपदी अशोक नायगावकर
Just Now!
X