महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करीत आहेत. या दौऱ्याची सुरुवात आज महाराष्ट्र दिनापासून होणार असून पालघर-ठाणे जिल्ह्यात हा पहिला दौरा होणार आहे. यानिमित्त राज ठाकरेंची वसई येथे जाहीर सभा झाली. दरम्यान, राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर आपले मतप्रदर्शन केले.

पालघर-ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यात राज ठाकरे वसई, पालघर, वाडा, विक्रमगड, भिवंडी, शहापूर, मुरबाड, उल्हासनगर, बदलापूर येथे कार्यकर्ते आणि जनतेची भेट घेणार आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज ठाकरेंची मोर्चेबांधणी सुरु असल्याचे बोलले जात आहे.

Raj Thackeray live Updates :

  • मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वे आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका
  • वसईतल्या चिमाजी आप्पांच्या शौर्याची गोष्ट
  • मंदिरांच्या ट्रस्टमध्ये परप्रांतीय हळूहळू शिरायला सुरु करतात त्यानंतर तीच संस्था ताब्यात घेतात
  • पालघरमध्ये गुजराती पाट्या कशासाठी लागतायत?
  • प्रकल्प येण्याआधीच नाणारमधील जमिनी गुजरातींनी विकत घेतल्या
  • गुजरातमध्ये ८५ टक्के स्थानिकांना कंत्राटी नोकऱ्यांतही  प्राधान्य, मग महाराष्ट्रात ते का नाही?
  • सत्ताधाऱ्यांनी लोकांना गृहित धरलंय
  • मोदी वरवर हिंदुत्वाचा जागर करतात, मात्र देशाला घुसखोरांनी पोखरल्याकडे त्यांचं लक्ष नाही
  • निवडणुकांसाठी भाजपावाल्यांकडे पैसे येतात कुठून?
  • इतका घाणेरडा पंतप्रधान आजवर पाहिला नाही
  • पंतप्रधान भारतीय डॉक्टरांची इज्जत देशाबाहेर चव्हाट्यावर आणताहेत
  • सत्ताधाऱ्यांनी सरकार आणि राज्याची थट्टा लावलीय
  • खोटारडे मोदी कोर्टाची शपथही बदलतील
  • संपूर्ण देशात आज वीज पोहोचली हा मोदींचा दावा खोटा
  • मोदी-शहा सांगणार तोच निर्णय मुख्यमंत्री घेणार
  • देवेंद्र फडणवीस काय मुख्यमंत्री आहेत, ते बसवलेले मुख्यमंत्री आहेत.
  • नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान भारताचे नाहीत
  • बेसावध राहिलो तर परप्रांतीय महाराष्ट्र लुटतील
  • महाराष्ट्र सरकारने मराठी शाळा बंद केल्याने शिक्षणात आरक्षणाचा फायदा मिळणार नाही
  • शिक्षणासाठी आणि सरकारी नोकऱ्यांसाठी आरक्षणाची गरज
  • आज आपणच शिवरायांचा विचार मारायला निघालोय
  • लोकांच्या आग्रहास्तव आजपासून ट्विटरवर आलो
  • महाराष्ट्राची सध्याची अवस्था प्रत्येक मराठी माणसांनी समजून घ्यायला हवी
  • संपूर्ण दौरा पक्ष बांधणीसाठी असेल
  • टप्प्याटप्प्यान महाराष्ट्र दौरा सुरु होणार असून तो ऑगस्टपर्यंत चालणार आहे.