रविवारी राज ठाकरे कल्याणमध्ये आले. मनसेने आयोजित केलेल्या विकासकामांचे भूमिपूजन करून भाषणबाजी न करताच निघून गेले. शिवसेना, काँग्रेस आघाडीने या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकला होता. हा शासकीय कार्यक्रम नसल्याने शासकीय, पालिकेचा एकही अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित नव्हता.
शासकीय निधी विकासकामांसाठी वापरला जात असताना पालकमंत्री गणेश नाईक, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेताच आमदार प्रकाश भोईर यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याची तक्रार काँग्रेसचे नगरसेवक सचिन पोटे यांनी केली होती. पालिका प्रशासनाला या प्रकरणी विश्वासात घेतले नव्हते. महापौर कल्याणी पाटील यांनीनिषेधाची भूमिका घेतली होती.  मुख्यमंत्री कार्यालयाने या कार्यक्रमाची गंभीर दखल घेताच जिल्हाधिकारी कार्यालयाने हा शासकीय कार्यक्रम नाही असे जाहीर
केले.
नाराजीचे वारे!
मनसेचे पालिकेत आणि संघटनेत उघडपणे दोन गट पडले आहेत.  विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्याविषयी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. नगरसेवकांच्या कामाचा आढावा व वाढलेल्या बेदिलाची दखल ठाकरे आज घेतील अशी अपेक्षा पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना होती, पण त्यांचाही हिरमोड झाला.