News Flash

बिहारचा विकास करून महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा – राज ठाकरे

'प्रादेशिक अस्मिता, विकास व सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाचा हा विजय आहे.

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेवर पुन्हा एकदा नितीश कुमार यांचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले असून, सर्व पक्षांकडून नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात झाली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्या स्टाइलमध्ये नितीश आणि लालू यांचे अभिनंदन केले आहे.
‘ब्रँड मोदीवर ब्रँड नितीश’ने मिळवलेला हा विजय आहे, या शब्दात राज यांनी लालू-नितीश यांचे अभिनंदन केले.  ‘प्रादेशिक अस्मिता, विकास व सामाजिक न्याय या त्रिसूत्रीवर आधारित राजकारणाचा हा विजय आहे.  पण त्यांनी आता बिहारचा विकास वेगाने करावा आणि महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवावेत’ असे सांगत राज यांनी महाराष्ट्रातील परप्रांतीय मुद्यावर बोट ठेवले.
तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नितीशकुमार यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2015 2:35 pm

Web Title: raj thackeray praised the victory of nitish kumar and lalu prasad yadav
टॅग : Raj Thackeray
Next Stories
1 राज्यात आज निवडणुका झाल्या तर शिवसेनेला पूर्ण बहुमत मिळेल – संजय राऊत
2 घरगुती कॅमेऱ्यांचे फ्लॅश ‘बंद’!
3 एसटीला दरवाढीचा फटका
Just Now!
X