30 September 2020

News Flash

‘अवनीच्या शिकाऱ्यांची शिकार महाराष्ट्रच करेल!’

राज ठाकरे यांनी सध्या राज्यभरात गाजत असलेल्या अवनी वाघिणीच्या शिकारीच्या मुद्यावरुन व्यंगचित्र रेखाटले आहे.

शब्दांच्या बरोबरीनेच आपल्या व्यंगचित्रांनी सत्ताधाऱ्यांना घायाळ करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या राज्यभरात गाजत असलेल्या अवनी वाघिणीच्या शिकारीच्या मुद्यावरुन व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रातून राज यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्र फडणवीस सरकारची शिकार करेल असे दाखवले आहे.

सध्या राज्यात अवनी वाघिणीच्या शिकारीचा मुद्दा प्रचंड गाजत आहे. विरोधी पक्षांसह अनेक वन्यजीव प्रेमींनी या मुद्यावरुन फडणवीस सरकारला लक्ष्य केले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली आहे. राज यांनी नेमका हाच धागा पकडून २०१९ मध्ये राज्य सरकारची स्थिती कशी असेल ते आपल्या व्यंगचित्रातून मांडले आहे.

सत्ताधाऱ्यांना माज आला असून २०१८ मध्ये फडणवीस सरकारने अवनीची शिकार केली. त्याचप्रमाणे २०१९ मध्ये महाराष्ट्र भाजपा-शिवसेना सरकारची शिकार करेल असे राज यांनी या व्यंगचित्रातून मांडले आहे. त्यामध्ये राज यांनी महाराष्ट्राला वाघाच्या रुपात दाखवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 5:57 pm

Web Title: raj thackray new cartoon on avani killing
Next Stories
1 कोरेगाव भीमा हिंसाचार: …तर मुख्यमंत्र्यांचीही चौकशी : आयोग
2 मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर सरकारची चालढकल, अजितदादांचा आरोप
3 ‘नेत्यांची मुलं सैन्यात का नाहीत’, शहीद केशव गोसावीच्या मामाचा सवाल
Just Now!
X