तरुण आणि पोलिसांमधील दुरावा दूर होऊन चांगले नाते तयार व्हावे, यासाठी रेल्वे पोलिसांनी रक्षाबंधानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळी पोलिसांना राखी बांधून हा कार्यक्रम साजरा केला.
रेल्वेचे नवीन पोलीस आयुक्त आर.के.सिंगल आणि मध्य रेल्वेच्या पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकात आयोजित सोहळ्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी पोलिसांनी राखी बांधली. यानिमित्ताने तरुण वर्ग आणि पोलिसांमध्ये चांगले नाते प्रस्थापित होऊन पोलिसांकडून अधिक चांगली सेवा दिली जाईल, असा विश्वास उपायुक्त अंबुरे यांनी व्यक्त केला.