News Flash

एसटी भरतीच्या अर्जांना मुदतवाढ

शिवशाहीत १३ फेब्रुवारीपासून दरकपात

(संग्रहित छायाचित्र)

एसटीतील चालक, वाहक पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्य़ांमधील उमेदवार १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतील. मुदतवाढीची घोषणा परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी केली.

एसटीत वाहक, चालकांची आठ हजार २२ पदे भरली जाणार आहेत. त्यापैकी चार हजार ४१६ पदे दुष्काळग्रस्त भागातून भरण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. महिला उमेदवारांसाठी उंचीची अट १६० सेंमीवरून १५३ सेंमी अशी शिथिल करण्यात आली. तर पुरुष उमेदवारांसाठी अवजड वाहन चालविण्याच्या अनुभवाची अट तीन वर्षांवरून एक वर्षांवर आणण्यात आली, असे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

शिवशाहीत १३ फेब्रुवारीपासून दरकपात

मुंबई : राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर एटी महामंडळाने शिवशाही शयनयान (एसी, स्लीपर) सेवेचे तिकीट दर २३० ते ५०५ रुपयांनी कमी केले आहेत. नवे तिकीट दर १३ फेब्रुवारीपासून लागू होतील, असे महामंडळाकडून सांगण्यात आले.नव्या दरपत्रिकेनुसार प्रवाशांना मुंबई-औरंगाबाद प्रवासासाठी १०८५ ऐवजी ८१० रुपये, मुंबई-लातूरसाठी १२७५ ऐवजी ९५० रुपये, मुंबई-रत्नागिरीसाठी ९५५ ऐवजी ७१५, मुंबई-कोल्हापूरसाठी १०५० ऐवजी ७८५, मुंबई-अक्कलकोटसाठी १२१० ऐवजी ९०५, मुंबई-पंढरपूरसाठी १०२० ऐवजी ७६०, बोरिवली-उदगीरसाठी १४८० ऐवजी ११०५, पुणे-नागपूरसाठी १९९० ऐवजी १४८५ रुपये मोजावे लागतील. राज्यात ४२ मार्गावर शिवशाही (स्लीपर) धावतात. त्या सर्व मार्गावरील तिकीट दर कमी करण्यात आले आहेत. खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी दरकपातीचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे पाठवला होता. स्पध्रेसोबत कमीत कमी पैशांत प्रवाशांना सुखकर प्रवास उपलब्ध करून द्यावा, हाही उद्देश दरकपातीमागे होता, असे महामंडळाचे अध्यक्ष रावते यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिकांना याआधीच ३० टक्के सवलत होती. नव्या दरपत्रिकेनुसार ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीचा प्रवास आणखी स्वस्त होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 12:21 am

Web Title: recruitment in st
Next Stories
1 पवारांनी लोकसभा लढावी म्हणून पक्षाच्या नेत्यांचा आग्रह
2 तरुण तेजांकित होण्याची तुम्हालाही संधी..
3 धावपट्टय़ांच्या डागडुजीमुळे विमानसेवा विलंबाने
Just Now!
X