मुंबई नगरी, बडी बांका! या नगरीमध्ये प्रत्येकासाठी संधी उपलब्ध आहे. म्हणूनच अनेकानेक वर्षांपासून केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपाऱ्यातून असंख्य लोक आपापाली स्वप्नं साकार करण्यासाठी मुंबईत येत आहेत; आणि ते येत राहतील. गेल्या तीन-चार दशकांमध्ये मुंबईच्या लोकसंख्येत झालेली अतोनात वाढ झाली आहे. पर्यायाने  लोकल गाडय़ांमधली वाढती गर्दी, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, कामाचा ताण या साऱ्यांना मुंबईकर सामोरा जात असतो. मात्र मुंबईकरांचं हे जिकिरीचं आयुष्य लवकरच सहज सोपं होणार आहे. राज्य सरकारने मुंबई आणि महानगर परदेशामध्ये एकूण पाच मेट्रो मार्गाचे बांधकाम हाती घेतले आहे. त्यामध्ये १८.५ कि.मी. लांबीच्या दहिसर (पश्चिम) ते डी. एन. नगर मेट्रो-२अ, २३.५ कि.मी. लांबीच्या डी.एन.नगर ते मानखुर्द मेट्रो-२ब, ३३.५ कि.मी. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो- ३, ३२ कि.मी. लांबीचा वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली मेट्रो-४ आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो -७ या पाच मेट्रो मार्गाचा समावेश आहे.

metro

या पाचही मेट्रो मार्गामुळे दहिसर ते वांद्रे (पाश्चिम) बीकेसी ते मानखुर्द, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, वडाळासारखे पारिसर जोडले जाणार आहेत. एकीकडे दहिसर (पाश्चिम) ते डी. एन. नगर मेट्रो-२अ, डी. एन. नगर ते मानखुर्द मेट्रो-२ब, वडाळा ते कासारवडवली मेट्रो-४ आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-७ हे चार मेट्रो मार्ग राज्य शासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबवीत असताना कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग-३ प्रकल्प मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे राबविण्याता येत आहे. ३३.५ कि.मी. लंबीच्या या संपूर्ण भुयारी मार्गाची अनेक वैशिष्टय़ं आहेत. हा मार्ग कफ परेड कुलाबा वरळी बीकेसी, एमआयडीसी आणि सीप्झ अशा सहा विविध व्यावसायिक ठिकाणांना भेट देतो व दक्षिण मुंबईपासून अंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत केवळ पन्नास मिनिटाता पोहोचवतो. शिवाय या मार्गामुळे १३ रुग्णालये, १२ शाळा, २१ महाविद्यालये, ११४ धार्मिक स्थळे, सहा उद्याने, तीन कला दालने, १३ सिनेमा व नाटय़गृहे, सहा मोठी मदान व सहा क्रीडा संस्थांना भेट देणंसुद्धा शक्य होणार आहे. मेट्रो-३ मार्गावरून दररोज किमान २० लाख मुंबईकर प्रवास करतील अशी अपेक्षा आहे.

आता थोडंसं कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाच्या दोन महत्त्वपूर्ण आणि बहुचíचत विषयांबद्दल. प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या काळबादेवी व गिरगावच्या रहिवाशांचे पुनर्वसन आणि आरे कॉलनीत बांधण्याता येणारी कार शेड, हे दोन्ही विषय निरनिराळ्या वर्गातून अनेकार्थानी चíचले गेले. या अनुषंगाने काही मुद्दे पुन्हा एकदा स्पष्ट करणे आवश्यक आहे.

महत्त्वाचा प्रश्न पुनर्वसनाचा. आजपर्यंत मुं.म.रे.कॉ.तर्फे ५०० प्रकल्पबाधितांना पर्यायी जागा देण्यात आली असून त्यांना नव्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मेट्रो-३ मार्गावरील उर्वरित प्रकल्पबाधितांना नव्या वर्षांत पार्यायी जागा देण्यात येणार आहे. काळबादेवी आणि गिरगाव येथील प्रकल्पाबाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आम्ही किंचित वेगळ्या पद्धतीने हाताळणार आहेत. मुं.म.रे.कॉ.ने काळबादेवी व गिरगावकरांनी उपस्थित केलेले मुद्दे विचारात घेऊन त्यांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने एक आराखडा तायार केला आहे. हा आराखाडा शासनानेही मान्य केला आहे. आजमितीला आम्ही काळबादेवी व गिरगावच्या रहिवाशांशी चर्चा करीत आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही आराखाडय़ाची यशस्वी अंमलबजावणी करू, अशी मला खात्री आहे. मेट्रो-३ मार्गाची अंमलबजावणी करताना मुं.म.रे.कॉ. २,८०७ प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करणार आहे. यामध्ये १,८६६ रहिवासी, ७९५ व्यावसायिक, ३९ रहिवासी आणि व्यावसायिक व  १०७ इतर प्रकल्पबाधितांचा समावेश आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पासाठीची कार शेड आरे कॉलनीतच बांधण्याचा हट्ट का, असा प्रश्न अनेक जण  आजही करताहेत. एकीकडे आम्ही मेट्रोच्या विरुद्ध नाही असे म्हणतानाच परिणामी नसíगक व सामाजिक घडी मात्र किंचितही बिघडणं त्यांना मान्य होताना दिसत नाही.  सुईच्या टोकावर राहील एवढी जमीनही मुंबईमध्ये सहजी उपालब्ध होत नाही. कारशेडसाठी तर त्याच्या किती तरी पटीने अधिक जमीन लागणार आहे. त्यातही कार शेड कुठेही उभारून चालत नाही. प्रकल्पाच्या सुरुवातीला किंवा शेवटी ती असावी लागते. मात्र उपलब्ध पर्यायांपकी कुलाबा सोडल्यास कुठलाच पार्याय प्रकल्पाच्या सुरुवातीला किंवा शेवटी नव्हता. कुलाबा येथेही समुद्रात भराव टाकल्यानंतर जागा उपलब्ध होणार होती आणि भराव टाकणे पार्यावरणाच्या दृष्टीने अधिक हानीकारक ठरले असते. याच सर्व बाबी ध्यानात ठेवून तांत्रिक समितीने आरेचा पार्याय नक्की केला. आरेची जागा दुग्ध उत्पादन विभागाची म्हणजेच शासनाची आहे आणि ती राज्य मंत्रिमंडळाने २०१४ मध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित केली.

आरेमध्ये कार शेड बांधल्यामुळे काही झाडे तोडावी लागणार आहेत हे खरे. पण वृक्ष प्राधिकरणाच्या नियमांनुसार तोडलेल्या झाडांच्या दुपटीने झाडे लावून त्याची भरपाई आम्ही करणार आहोत. आजपर्यंत ४५० झाडे लावण्यात आली आहेत आणि अधिक झाडे लावण्यासाठी आम्ही अतरिक्त जागेची मागणीसुद्धा केलेली आहे. याच अनुषंगाने येथे काही नितांत महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मेट्रो-३ मुळे चार लाख ५० हजारांहून अधिक वाहने रस्त्यावरून कमी होणार आहेत व त्यामुळे दररोज जवळपास तीन लाख लिटर इतक्या इंधनाची बचत होणार आहे. याचा किती चांगला परिणाम पार्यावरणावर होणार आहे हेसुद्धा आपण विसरून चालणार नाही.

मुंबई आगळी आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. म्हणूनच तिची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आजमितीला मुंबईला नितांत गरज आहे ती मेट्रोची. या मेट्रोमुळेच नाहक बळी जाणारे जीव वाचवता येणार आहेत. मुंबईचं पार्यावरण सुधारता येणार आहे. मुंबईचा कोंडलेला श्वास मोकळा करता येणार आहे. मुंबईला पुन्हा एकदा जिवंत करता येणार आहे. मुंबईचं हरवलेलं वैभव परत मिळवता येणार आहे.