20 September 2020

News Flash

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण, फडणवीस म्हणतात ‘गुंडाराज थांबवा’

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका

निवृत्त नौदल अधिकाऱ्याला फक्त एका व्हॉट्स अॅप फॉरवर्डमुळे शिवसैनिकांनी मारहाण केली. हा सगळा प्रकार म्हणजे गुंडाराज आहे. उद्धवजी गुंडाराज आवरा असं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी गुंडाराज आवरा, एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला निव्वळ एका व्हॉट्स अॅप फॉरवर्डमुळे शिवसैनिकांनी मारहाण केली आहे हा सगळा प्रकार निषेधार्ह आहे असं म्हटलं आहे. घडलेला हा सगळा प्रकार अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे गुंडाराज थांबवा असं म्हटलं आहे.

ज्या गुंडांनी निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करा अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच यासंदर्भातली एक बातमीही त्यांनी ट्विट केली आहे.

काय आहे प्रकरण?
नौदलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याला काही शिवसैनिकांनी एका व्हॉट्स अॅप फॉरवर्डमुळे मारहाण केली असं वृत्त टाइम्स नाऊनं दिलं आहे. शिवसेनेच्या सात गुंडांनी या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप शुक्रवारी अतुल भातखळकर यांनी केला होता. मुंबईतल्या कांदिवली भागातल्या शाखा प्रमुखाने ही मारहाण केल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. दरम्यान हीच बातमी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना गुंडाराज थांबवा असं म्हटलं आहे. या निवृत्त नौदल अधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंसंदर्भातलं एक व्यंगचित्र व्हॉट्स अॅपवरुन फॉरवर्ड केलं होतं त्यावरुन त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यांच्या याच दुखापतीचा फोटोही देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 10:31 pm

Web Title: retired naval officer got beaten up by goons because of just a whatsapp forward pls stop gundaraj uddhav thackerayji says devendra fadanvis scj 81
Next Stories
1 मुंबईत मास्क न लावणाऱ्यांवर आता महापालिकेचा कारवाईचा बडगा!
2 “कंगनावर पालिकेने अन्याय केलाय, अधिकाऱ्यांवर कारवाई करा,” आठवलेंची राज्यपालांकडे मागणी
3 ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’मुळे २५ हजार महिलांना सुरक्षित मातृसुखाची अनुभूती!
Just Now!
X