18 January 2019

News Flash

‘त्या’ चिमुकलीचा जीव वाचवणाऱ्या जवानाला महाराष्ट्र सुरक्षा दलाकडून दहा हजारांचे बक्षीस

महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका पाच वर्षीय चिमुकलीचा जीव वचवणारा जवान सचिन पोळ यांना प्रशासनाने १० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. मुंबईच्या पश्चिम

महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका पाच वर्षीय चिमुकलीचा जीव वचवणारे जवान सचिन पोळ यांना प्रशासनाने १० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका पाच वर्षीय चिमुकलीचा जीव वचवणारा जवान सचिन पोळ यांना प्रशासनाने १० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. मुंबईच्या पश्चिम रेल्वेमार्गावरील महालक्ष्मी स्थानकात शुक्रवारी ११ तारखेला सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली होती.


मोहम्मद दिलशान हे भिवंडीतील रहिवासी आपली पाच वर्षाची मुलगी आणि पत्नीसोबत हाजी अली येथे आले होते. शुक्रवारी ११ तारखेला सायंकाळी ५ च्या सुमारास परतण्यासाठी त्यांनी महालक्ष्मी स्थानकावरुन धावती लोकल पकडली. लोकलनं वेग घेतल्यानं दिलशान यांची पत्नी इजरा नावाच्या त्यांच्या मुलीला लोकलमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत होती पण तीला वेळीच मुलीला लोकलमध्ये ओढता आलं नाही. तोल गेल्यानं मुलगी ट्रेनच्या खाली जाऊ लागली. हा प्रकार स्थानकावरील इतर प्रवासी पाहत होते. त्याचवेळी सचिन पोळ यांनी त्या दिशेने धाव घेतली, आणि आईच्या हातातून मुलीचं बोट निसटणार इतक्यात त्यांनी प्रसंगावधान राखत मुलीला लोकलपासून लांब ओढलं. मदतीला एक किंवा दोन सेकंद जरी उशीर झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता हे सीसीटीव्ही दृष्यांवरुन स्पष्ट होतं.

याबाबत मुंबई मिररसोबत बोलताना दिलशान म्हणाले, माझी पत्नी मुंबईमध्ये नवीन आहे, तिला मुंबईच्या लोकलविषयी फारशी माहिती नाही. मी पुढे चालत होतो, आणि तिने मुलीचा हात धरला होता. आम्ही पोहोचलो तेव्हा लोकल स्थानकावर थांबली होती, आम्ही लोकलमध्ये चढत असतानाच अचानक लोकल सुरू झाली आणि लगेच तिचा वेग वाढला. माझ्या मुलीचे प्राण वाचवणाऱ्या व्यक्तीबद्दल मी सदैव आभारी राहिल.
सचिन पोळ यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं आणि धाडसाचं सर्वच स्थरांतून कौतूक होत आहे. दरम्यान, सचिनच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र सुरक्षा दल्याच्या लौकिकात भर पडल्याने या विशेष कार्याबद्दल सचिन यांना १० हजार रुपयांची बक्षिसी जाहीर करण्यात आली आहे.

First Published on May 17, 2018 3:39 am

Web Title: rs 10 thousand reward announced from the maharashtra security guard to jawan who rescue the girl child