News Flash

वाझे यांच्या खात्यातून २६ लाखांचा संशयास्पद व्यवहार

मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही एनआयएकडून सुरू आहे.

लॉकरमधून कागदपत्रे काढल्याची शक्यता

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या वर्सोवा येथील बँक खात्यातून १८ मार्चला २६ लाख ५० हजार रुपये काढण्यात आले. त्याच बँकेतील लॉकरमधून तपासाची संबंधित महत्त्वाची कागदपत्रेही काढून घेण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.

वाझे यांचे एका महिलेबरोबर या बँकेत खाते होते. १३ मार्चला वाझे यांना अटक केल्यानंतर १८ मार्चला या बँक खात्यातून संशयास्पद व्यवहार झाल्याचा तपास एनआयएकडून केला जात आहे. त्याचबरोबर याप्रकरणाशी संबंधित लॅपटॉप, डीव्हीआर, सीपीयू आदी साहित्य जप्त केले असून त्याचाही तपास एनआयएला करायचा आहे. त्यामुळे वाझे यांची कोठडीची मागणी एनआयएकडून करण्यात आली होती. विशेष न्यायालायाने वाझे यांच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा तपासही एनआयएकडून सुरू आहे. मनसूख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला होता. हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणी वाझे ४ मार्चला फिरताना आढळून आल्याचा दावा एनआयएने न्यायालयात केला. तसेच एनआयएने २ एप्रिलला एक मर्सिडीज कार जप्त केल्याची माहिती न्यायालयात दिली. दरम्यान वाझे यांच्याबरोबर लॉकर असलेल्या महिलेला गुरुवारी एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हृदयविकारासंबंधीत आजाराच्या उपचारांची मागणी वाझे यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. वाझे यांना हृदयविकाराचा आजार असून  अँजिओग्राफी करण्याची गरज आहे, असे त्यांच्या वकीलाने न्यायालयाला सांगितले. मात्र वाझे यांना योग्य ते उपचार दिले जात आहेत, असे एनआयएने न्यायालयाला सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 1:09 am

Web Title: sachin vaze case possibility of removing documents from the locker akp 94
Next Stories
1 ‘फोर्ब्स’ मासिकाच्या यादीत ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ वकील युवराज नरवणकर
2 Coronavirus – मुंबईत मागील २४ तासांत ९ हजार ९० नवीन करोनाबाधित, २७ रूग्णांचा मृत्यू
3 Antilia Bomb Scare Case : सचिन वाझेंच्या NIA कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ!
Just Now!
X