मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगून गेल्याच महिन्यात बाहेर पडलेला अभिनेता संजय दत्त याने सोमवारी पारपत्र परत मिळवण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. त्यामुळे न्यायालयात अर्ज करण्याची ही संजयची शेवटची वेळ असणार आहे.

सोमवारीच संजयच्या या अर्जावर सुनावणी झाली आणि सीबीआयच्या वतीनेही त्याला पारपत्र देण्यास काहीही आक्षेप नोंदवण्या न्यायालयात अर्ज करण्याची ही संजयची शेवटची वेळ असणार आहे.त आला नाही. त्यामुळे न्यायालय मंगळवारी संजयच्या अर्जावर निर्णय देणार आहे. संजयचे नवे पारपत्र सीबीआयच्या ताब्यात आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर लगेचच त्याला पारपत्र परत करण्यात येईल.

बॉम्बस्फोटापूर्वी आणण्यात आलेल्या शस्त्रास्त्र साठय़ापैकी एक-४७ रायफल बाळगल्याचा आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्याचा आरोप संजयवर होता. १९ एप्रिल १९९३ रोजी त्याला अटकही करण्यात आली होती. १८ महिने तो कारागृहात होता. नंतर तो जामिनावर बाहेर आला. विशेष ‘टाडा’ न्यायालयाने त्याला एके-४७ रायफल बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवत सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती.