डोंबिवलीत भाजपाचा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून कल्याण गुन्हे शाखेने १७० प्राणघातक शस्त्रं जप्त केली. यानंतर आता भाजपावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका होते आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी धनंजय कुलकर्णीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातले फोटो ट्विट करून संघाला हिंसा घडवणाऱ्यांची पिढी घडवायची आहे का? असा प्रश्न विचारला आहे. धनंजय कुलकर्णीच्या दुकानात जी हत्यारे मिळाली त्यातून संघाला कोणता राष्ट्रवाद निर्माण करायचा आहे असाही प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला आहे.
ये हैं #RSS के देशभक्त स्वयंसेवक श्री धनंजय कुलकर्णी।
डोंबिवली में #BJP के पदाधिकारी हैं
इनकी दुकान से पुलिस छापे में हथियारों का यह ज़ख़ीरा ज़ब्त हुआ है।
इन हथियारों से ये राष्ट्रवाद की कौन-सी पेड़ उगाना चाहते हैं,यह सवाल है।
हिंसाजीवियों की नई पीढ़ी संघ क्यों तैयार कर रहा है? pic.twitter.com/npqpJnx3uX
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 17, 2019
काय आहे प्रकरण?
डोंबिवलीतील महावीरनगर भागात अरिहंत इमारतीच्या तळमजल्यावर तपस्या फॅशन हाऊस हे दुकान आहे. हे दुकान भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या मालकीचे आहे. धनंजय कुलकर्णी हा भाजपाचा डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहे. त्याच्या दुकानात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलिसांनी छापा टाकून शस्त्रसाठा जप्त केला. जप्त करण्यात आलेला शस्त्रसाठा सुमारे 2 लाख रुपयांचा आहे. यात तलवारी, एअर गन अशा शस्त्रांचा समावेश आहे. भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून शस्त्रसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली. आता यानंतर चारही बाजूने भाजपा आणि संघावर टीका होताना दिसते आहे.