स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या काढून टाकण्यात आलेल्या काव्यपंक्ती पुन्हा अंदमानमधील सेल्युलर जेलमध्ये उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या ४ जुलै रोजी या काव्यपंक्ती पुन्हा या सेल्युलर जेलमध्ये झळकणार आहेत.
मणिशंकर अय्यर यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री असताना अंदमान येथील सावरकरांच्या काव्यपंक्ती काढून टाकल्या होत्या. त्या पुन्हा तेथे बसविण्याचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारने केला होता. सावरकरांच्या काढलेल्या काव्यपंक्ती पुन्हा मुळ जागेवर बसविण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. आता येत्या ४ जुलै रोजी या काव्यपंक्ती तेथे बसविण्यात येणार आहेत. हे काव्यशिल्प ३० टन वजनाचे आहे, असे राहुल शेवाळे यांनी सांगितले.