News Flash

पंकज भुजबळ यांना दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, अटक अटळ

विशेष न्यायालयाने पंकज यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह कोटय़वधींच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. पंकज भुजबळ यांच्याविरोधात बजावण्यात आलेल्या अजामीनपात्र अटक वॉरंटला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने पंकज यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. पण न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिल्यामुळे त्यांची अटक अटळ आहे.


छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) दाखल केलेल्या आरोपपत्रातील पंकज यांच्यासह अन्य ३४ आरोपींच्या नावेही विशेष न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश पी. आर. भावके यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. आरोपी सहकार्य करत नसल्याची तक्रार केल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने ‘ईडी’ला दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2016 1:09 pm

Web Title: sc refuses to stay nbw issued against pankaj bhujbal
टॅग : Pankaj Bhujbal
Next Stories
1 काहिली ओसरणार
2 नियमित व्यायामाने कर्करोगाच्या शक्यतेत घट
3 राज्यात पोलीसच लाचखोरीत पुढे!
Just Now!
X