करोनाविरोधी लढय़ात महत्वाची जबाबदारी हाताळणाऱ्या मुंबईतील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. आजघडीला राज्यात १ हजार ३४४ करोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत ८५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई पोलीस दलातील ३ हजार ३४२ अधिकारी, कर्मचारी बाधित झाले होते. त्यापैकी चार अधिकारी आणि ४६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. २ हजार ७३७ पोलीस करोनामुक्त झाले. २ हजार २४ जण कामावर परतले.

पोलीस दलाच्या प्रशासकीय विभागाने केलेल्या विश्लेषणानुसार २७ टक्के  पोलिसांना कामाच्या ठिकाणी, बाधित सहकाऱ्यांच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण झाली.

हवालदाराचा मृत्यू

घाटकोपर पोलीस ठाण्याचे हवालदार भरत शिगवण (५४) यांचा १४  जुलैला  रुग्णालयात उपचार मिळण्याआधीच मृत्यू झाला. मृत्यूपश्चात केलेल्या चाचणीत ते करोनाबाधित होते, असे निदान झाले.