मुंबई : बेस्ट उपक्र माच्या मजास आगारातील विविध पदांवर असणाऱ्या सात कर्मचाऱ्यांचा करोनाने मृत्यू झाला आहे. बेस्टमध्ये ९ हजार ५०० वाहक आणि ९ हजार चालक आहेत. टाळेबंदी सुरू होताच बेस्ट उपक्र माने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा देण्यास सुरुवात के ली. ८ जूनपासून बेस्ट सर्वासाठी खुली झाली आणि प्रवासी संख्याही वाढली. कामावर हजर होण्यासाठी नोटीस दिल्यानंतर हळूहळू चालक-वाहकही कर्तव्यावर येऊ लागले. त्यातच अनेक चालक-वाहकांना करोनाची बाधा झाली.

आतापर्यंत बेस्टमधील १,६४८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. यामध्ये परिवहन विभागातीलच सर्वाधिक असून त्यातही सुमारे ९०० पेक्षा जास्त चालक-वाहक आहेत. प्रवाशांशी थेट संबंध येणे, आगारात वावरताना शारीरिक अंतर न राहणे, कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर पुरवण्यातही बेस्टकडून हयगय होणे, त्यामुळे करोनाचा संसर्ग झालेल्या कामगारांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात आले. चालक, वाहकांबरोबरच परिवहन विभागातील तंत्रज्ञ, वाहतुक निरीक्षक यांचाही समावेश आहे.

एकू ण करोनाबाधित रुग्णांमध्ये विद्युत विभाग, अभियंता विभागासह अन्य विभागातील कर्मचारी असल्याची माहिती देण्यात आली. आतापर्यंत १,३७५ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत, तर २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत कर्मचाऱ्यांमध्ये चालक-वाहकच जास्त आहेत.

सुरक्षिततेविषयी प्रश्न

बेस्टच्या मजास आगारातील मृत कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. या आगारातील चालक, वाहक व अन्य पदावर असणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी घेण्यात येणाऱ्या खबरदारीबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. यापाठोपाठ मरोळ व अन्य आगारातीलही कर्मचारी आहेत.