News Flash

‘रेड चिलीज’मधील कर्मचाऱ्याचं निधन; शाहरुखने व्यक्त केल्या भावना

अभिजीत, शाहरुखच्या टीममधील महत्त्वाचा सदस्य होता

शाहरुख खान

देशावर करोना विषाणूचं संकंट असल्यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण या समस्येमुळे हैराण झाला आहे. त्यातच या काळात अभिनेता शाहरुख खानने त्याच्या जवळची व्यक्ती गमावली आहे. शाहरुखच्या रेड चिलीज एन्टरटेन्मेंट कंपनीत काम करणाऱ्या अभिजीत या कर्मचाऱ्याचं निधन झालं आहे. शाहरुखने ट्विट करुन ही माहिती देत शोक व्यक्त केला आहे.

“आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ड्रीम्स अनलिमिडेटसोबत कामाची सुरुवात केली होती. अभिजीत माझा फार चांगला सहकारी होता. आम्ही एकत्र मिळून अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती केली. काही वेळा अपयशही पाहिलं. मात्र आम्ही कायम पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहिलो. तो टीममधला एक आभारस्तंभ होता. तुझी फार आठवण येईल मित्रा”, असं ट्विट शाहरुख खानने केलं आहे.

दरम्यान, शाहरुखप्रमाणेच रेड चिलीजकडून देखील एक ट्विट करुन अभिजीत यांनी आदरांजली वाहण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी अभिनेता आमिर खानच्या अस्टिटंटचंदेखील निधन झालं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 10:06 am

Web Title: shah rukh khan mourn on death of red chillies first team member abhijeet ssj 93
Next Stories
1 हृतिकसोबत असलेल्या या मुलाला ओळखलंत का?; आता आहे सर्वांत लोकप्रिय अभिनेता
2 Birthday Special : विकी कौशलचं शिक्षण माहितीये का?
3 कैफ नव्हे तर ‘या’ आडनावाने ओळखली जायची कतरिना
Just Now!
X