27 February 2021

News Flash

शरद पवार जनतेमधून निवडणूक नाही लढणार

मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या उमेदवारीबद्दल बऱ्याच चर्चा सुरु होत्या. ते पुण्यातून निवडणूक लढवू शकतात असे बोलले जात होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढच्यावर्षी आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या उमेदवारीबद्दल बऱ्याच चर्चा सुरु होत्या. ते पुण्यातून निवडणूक लढवू शकतात असे बोलले जात होते. अखेर खुद्द पवारांनीच या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मी कुठलीही निवडणूक लढवणार नसून उगाच माझ्या नावाची चर्चा करु नका असे शरद पवारांनी मुंबईत सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. सध्या पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे भक्कम नेतृत्व नसल्याने शरद पवारांनी पुण्यातून निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची इच्छा होती. पुणे लोकसभा मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे. २०१४ मध्ये इथून विश्वजित कदम यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला.

पार्थ पवारांच्या उमेदवारीला शरद पवारांकडून ब्रेक?
मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण खुद्द शरद पवारच पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल फारसे अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी थेट पार्थ पवारांच्या नावाला विरोध केला नसला तरी पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा सवाल त्यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारला.

शरद पवारांच्या या भूमिकेवर अजित पवारांनी अजून तरी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची मागच्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु होती. मागच्या काही वर्षात झालेल्या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुण्यातील हा मतदारसंघ जिंकता आलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघातून अजित पवारांचे सुपूत्र पार्थ पवार यांना निवडणूक रिंगणात उतरवेल अशी चर्चा होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 1:25 pm

Web Title: sharad pawar will not contest loksabha election
टॅग : Ncp,Sharad Pawar
Next Stories
1 पार्थ पवारांच्या उमेदवारीला शरद पवारांकडून ब्रेक? अजित पवारांचे मौन
2 प्रतिबंधित क्षेत्रात मासेमारी करणारे दोन ट्रॉलर्स पकडले
3 महाराष्ट्रात सैराट! आई वडिलांकडूनच मुलीची हत्या
Just Now!
X