शरद राव कामगारांच्या जीवाशी खेळत असून ते त्यांचे वाटोळे करणार आहेत, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ रिपब्लिकन नेते नामदेव ढसाळ यांनी शरद राव यांच्या नेतृत्वावर टीका केली. छायाचित्रकार सुधारक ओलवे यांच्या ‘न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात’ या सफाई कामगारांच्या जीवनावरील छायाचित्र-पुस्तकाचे प्रकाशन करताना ढसाळ यांनी राव यांच्यावर तीव्र टीका केली. आम्ही सफाई कामगारांचे जीवन जगलो आहोत. त्यांच्या सुखदु:खांशी समरस झालो आहोत. पण शरद राव यांनी जॉर्ज फर्नांडिस आणि अन्य समाजवाद्यांनी कष्टाने उभारलेल्या संघटना ताब्यात घेऊन त्यांना पळवून लावले आणि आपले नेतृत्व स्थापले. त्यांनी सर्वांनाच फसवले आहे.
ते आता कामगारांच्या जीवनाशी खेळत आहेत. कामगारांचे वाटोळे करणार आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी राव यांच्यावर टीका केली.
 समाजातील सफाई कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याची आवश्यकता आहे. मात्र राव यांच्या नेतृत्वाखालील संघटना त्यांचे केवळ शोषण करत आहे.
 त्यांना कोणत्याही सुविधा मिळवून देण्यासाठी अथवा त्यांच्या उत्कर्षांसाठी राव काही करत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

समाजवाद्यांनी कष्टाने उभारलेल्या संघटना ताब्यात घेऊन त्यांना पळवून लावले आणि आपले नेतृत्व स्थापले. त्यांनी सर्वांनाच फसवले आहे.