प्रादेशिक पक्षांमध्ये देशात सेनेला सर्वाधिक राजकीय देणग्या

मुंबई या देशाच्या आर्थिक राजधानीतील महानगरपालिकेसह ठाणे महानगरपालिकेची सत्ता ताब्यात असलेली आणि आणि राज्यातील सरकारमध्ये भागीदार असलेली शिवसेना ही देशातील सर्व प्रादेशिक पक्षांमध्ये राजकीय देणग्या मिळवण्यात अव्वल ठरली आहे. शिवसेनेला २५ कोटी ८४ लाख रुपयांच्या देणग्या मिळाल्या असून रोमा बिल्डर्स प्रा. लि, भैरवनाथ शुगर वर्क्‍स लि., ओंकार रिअ‍ॅल्टर, कल्पतरू प्रॉपर्टीज, पॅलाडियम कन्स्ट्रक्शन, रुबी मिल्स, नहार बिल्डर्स अशा मंडळींचा बडय़ा देणगीदारांत समावेश आहे.

Narendra Modi congress manifesto Muslims comment Loksabha Election 2024
“काँग्रेस देशाची संपत्ती मुस्लिमांना देईल”, मोदींचा आरोप; जाहीरनामा काय सांगतो?
akola lok sabha marathi news, akola lok sabha latest news in marathi
अकोला : उमेदवारांपुढे सर्वांना एकसंघ ठेवण्याचे आव्हान! महायुती व आघाडीच्या धर्माचे पालन…
BJP invited global parties
“भारतात या, बघा आम्ही कसे जिंकतो?”; परदेशातील तब्बल २५ पक्षांच्या प्रतिनिधींना भाजपाने दिले निमंत्रण! दाखविणार ‘लोकशाहीचा सोहळा’
Lok Sabha elections in Telangana between Congress and BJP
तेलंगणमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यात चुरस

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्षाला त्याला मिळणाऱ्या देणग्यांचा ताळेबंद सादर करावा लागतो. २० हजार रुपयांपेक्षा मोठय़ा रकमेच्या प्रत्येक देणगीचा तपशील बडय़ा कंपन्या आणि इतर छोटे-वैयक्तिक देणगीदार अशी विभागणी करून आयोगाला सादर करावा लागतो.

२०१६-१७ मध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा तपशील निवडणूक आयोगाना जाहीर केला असून त्यात प्रादेशिक पक्षांचा विचार करता मुंबईवर सत्ता गाजवणारी शिवसेना ही देणगी मिळवण्यात आघाडीवर आहे.

रोमा बिल्डर्स प्रा. लि.ने प्रत्येकी १ कोटी रुपयांच्या पाच धनादेशांद्वारे ५ कोटी रुपये, भैरवनाथ शुगर वर्क्‍स लि.ने प्रत्येकी २ कोटी रुपयांच्या दोन वेगवेगळ्या धनादेशांद्वारे एकूण ४ कोटी रुपये, मॉडर्न रोड मेकर्स प्रा. लि. या कंपनीने दोन कोटी रुपये, ए. एन. इंटरप्रायजेस इन्फास्ट्रक्चर सव्‍‌र्हिस प्रा. लि.ने दोन कोटी रुपये, कल्पतरू प्रॉपर्टीज लि.ने ५५ लाख रुपये, जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.ने २५ लाख रुपये, पॅलाडियम कन्स्ट्रक्सन्स प्रा. लि.ने ६ लाख रुपये, ओंकार रिअ‍ॅल्टर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सने ४ लाख रुपये, नहार बिल्डर्सने एक लाख रुपये अशारीतीने ७१ कॉर्पोरेट देणगीदारांनी एकूण १८ कोटी ३ लाख ४  हजार ७०१ रुपयांची देणगी दिल्याचे शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या ताळेबंदात म्हटले आहे.

याशिवाय वैयक्तिक देणगीदार, शिवसेनेच्या विविध संस्था यांच्याकडून ७ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी पक्षाला राजकीय देणगीच्या स्वरूपात मिळाला आहे. त्यात शिवसेना चित्रपट सेनेकडून ४० लाख रुपये, आमदार नीलम गोऱ्हे यांच्याकडून एक लाख ११ रुपये, पूर्वेश प्रताप सरनाईक ५० हजार रुपये, परिषा प्रताप सरनाईक ५० हजार रुपये, बालाजी किणीकर १ लाख रुपये यांच्यासारख्या शेकडो वैयक्तिक देणगीदार व छोटय़ा व्यावसायिकांचा समावेश आहे. मुंबई व ठाणे परिसरांत वेगवेगळे व्यवसाय, मुंबई महापालिकेशी संबंधित कंत्राटदार यांचा स्वाभाविकच कॉर्पोरेट आणि वैयक्तिक व छोटय़ा व्यावसायिक देणगीदारांमध्ये समावेश दिसत आहे.

अशारीतीने शिवसेनेकडे २०१६-१७ मध्ये एकूण २५ कोटी ८४ लाख रुपयांच्या देणग्या आल्या. तर त्यापाठोपाठ दिल्लीत सरकारमध्ये असलेल्या आम आदमी पार्टीने २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या देणग्या मिळवल्या आहेत.

शिवसेना हा सर्वसामान्यांसाठी काम करणारा पक्ष आहे अशी सर्वाना खात्री पटली आहे. शिवसेनेतर्फे विविध उपक्रम वर्षभर सुरू असतात. हे सर्व काम मोठय़ा कंपन्या, बिल्डर असोत की छोटे व्यावसायिक सर्व जण पाहत असतात. त्यामुळे शिवसेनेला देणगी दिली तर ती सामाजिक कार्यात वापरली जाऊन सत्कारणी लागणार याचा त्यांना विश्वास असतो. म्हणूनच राजकीय देणगी देताना ते शिवसेनेला पसंती देतात.       अनिल परब, शिवसेना आमदार आणि विधान परिषदेतील गटनेते