एसटीकडून प्रवाशांच्या जीवाशी खेळ
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य मिरवणारे राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे समोर आले आहे. काही शिवनेरी गाडय़ांच्या योग्यता प्रमाणपत्राचे नुतणीकरण केले नसतानाही या गाडय़ा बिनधास्त रस्त्यावर चालवल्या जात आहे. अशाच चार शिवनेरी बस गाडय़ांवर बुधवारी ताडदेव प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई करण्यात आली. मात्र योग्यता प्रमाणपत्राचे नुतणीकरण झाले नसतानाही या गाडय़ा प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जात असून त्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्याने नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून सुरू असलेल्या काही शिवनेरी बस गाडय़ांवर योग्यता प्रमाणपत्राचे नुतणीकरण केले नसल्याचे समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाकडून दुर्लक्षित केली जाणारी ही बाब धक्कादायक असल्याचा आरोप केला जात आहे. शिवनेरीच्या बस गाडय़ांचे योग्यता प्रमाणपत्राचे (फिटनेस सर्टिफिकेट) नुतणीकरण केले नसल्याने गाडी चालवल्यास अपघात होऊ शकतो. त्यातही दुदैवाने अपघात झाल्यास प्रवाशांना पुरविण्यात येणारा विमा नाकारला जाऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती कळताच राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी या गोष्टींची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivneri bus dont have eligibility certificate
First published on: 12-02-2016 at 03:28 IST