18 January 2018

News Flash

मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक विकत घेण्याचा प्रयत्न; किरीट सोमय्यांचा आरोप

निवडणूक आयोगाने हा प्रकार थांबवण्यासाठी त्वरीत पावेल उचलावीत

मुंबई | Updated: October 13, 2017 2:54 PM

kirit somaiya : किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग आणि कोकण महसूल विभागाला याची तक्रार करणारे पत्र पाठवले आहे. मात्र, या पत्रात शिवसेनेच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही.

मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर सातत्याने टीका करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी सत्ताधाऱ्यांवर आणखी एक गंभीर आरोप केला. पालिकेतील एका मोठ्या पक्षाकडून नगरसेवकांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी या नगरसेवकांना कोट्यवधी रूपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत, असे ट्विट करून सोमय्यांनी खळबळ उडवून दिली. त्यांच्या या विधानाचा रोख शिवसेनेकडे असल्याची चर्चा आहे.

किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग आणि कोकण महसूल विभागाला याची तक्रार करणारे पत्र पाठवले आहे. मात्र, या पत्रात शिवसेनेच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. केवळ महापालिकेतील एका मोठ्या पक्षाकडून अशा प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संबंधित पक्षाकडून पालिकेतील दोन नगरसेवकांशी संपर्कही साधण्यात आला होता. त्यांना कोट्यवधी रूपयांची ऑफर देण्यात आली. हा भ्रष्टाचाराचा प्रकार असून, लोकशाहीविरोधी आहे. याच्याविरुद्ध त्वरीत कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे पोलीस, कोकण महसूल विभाग आणि निवडणूक आयोगाने हा प्रकार थांबवण्यासाठी त्वरित पावेल उचलावीत, अशी मागणी सोमय्या यांनी पत्रात केली आहे.

भाजपच्या पाठपुरावा समितीपासून किरीट सोमय्या दूर

भांडुप पोटनिवडणुकीत गुरूवारी भाजपला विजय मिळाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी संख्याबळ वाढल्याने महापालिकेत भाजपची सत्ता व महापौर येईल, असा दावा केला होता. भाजपने निवडणुकीसाठी नियोजनबद्ध पावले टाकली होती. बूथरचना, नेत्यांच्या सभा व पदयात्रांचे नियोजन केले होते. त्यामुळे शिवसेनेला यश मिळू शकले नाही व भाजपची मते वाढली. शिवसेनेला फटका बसला आहे. आता तरी उद्धव ठाकरे यांचा उद्धटपणा कमी होणार का, असा सवाल सोमय्या यांनी विचारला होता.

First Published on October 13, 2017 2:53 pm

Web Title: shivsena trying to buy influence couple bmc corporators says kirit somaiya
 1. P
  Prabhakar
  Oct 13, 2017 at 11:15 pm
  भाजप आपल्या कर्माची फळ लवकरच भोगणार आहे.त्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे काँग्रेस मधून काही ज्यांचा कौटुंबिक सत्ता भोगणे हा व्यवसाय आहे ते शिवसेनेतून,काँग्रेस मधून लाचारीने सत्ता भोगून सत्ता गेल्यावर भाजप ने मंत्रिपदाची आश्वासने देऊन विकत घेतली असे राज्यभर भाजप ने सत्तेचा बाजार करून लोक फाडणे हा धंदा चालू केला आहे भाजप ने खोटी लबाडी करून जनतेची घोर फसवणूक चालू केली आहे एक मा.मोदी भाषणे देऊन काहीही होणार नाही कारण खाली काम करणारे सर्वपक्षीय फोडलेले सत्तेवर बसवून भ्रष्ट लोक काय कप्पाळ काम करणार भाजप फक्त सत्तेची गणिते जमवण्याच्या मागे लागला आहे सत्ता भोगणे हेच भाजप चे अंतिम ध्येय आहे.तसेच आशिष शेलार व ते भाजप चे सर्वेसर्वा समजणारे किरीटभाई सोमय्या हे भाजपचे समाजातील भाजप चे मतांचे वाटोळे करण्यास पुरून उरतील.झपाट्याने भाजप बद्दल जनतेत भ्रमनिरास होऊ लागला आहे.
  Reply
  1. S
   shrikant
   Oct 13, 2017 at 10:12 pm
   वा: सौ सोनारकी एक लोहारकी !! काँग्रेसचे नगरसेवक मरायची वाट पाहणाऱ्यांना छान चपराक दिली ..तोमैय्या आता चरफडत बसेल.
   Reply
   1. सुधीर
    Oct 13, 2017 at 8:17 pm
    आले किलीत टोमाय्या, किती किट किट कलतो ले तू ,
    Reply
    1. H
     harshad
     Oct 13, 2017 at 6:18 pm
     Tumhi काय केलेत
     Reply
     1. Pankaj Sawant
      Oct 13, 2017 at 4:19 pm
      अले बाबा, तुमि लोटानी पण भांडुप मध्ये काँग्रेस च्या नगरसेवकाला थॅलेदी तेले ना?" मग आता ता बोंबलता स्वतः केले ते पुण्य आणि दुसर्याने तेले ती पाप?
      Reply
      1. N
       ncvn
       Oct 13, 2017 at 3:43 pm
       मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ७ पैकी ६ नगरसेवकांनी स्वतःचा गट तयार करून शिवसेनेसोबत सत्तेत भागी होण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या परवानगीशिवाय मनसेच्या नगरसेवकांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना त्यांना फोडण्यात यशस्वी झाल्याचं बोललं जातंय. ही खेळी करून सेनेनं मनसे आणि भाजप या दोन्ही पक्षांना 'जोर का झटका' दिल्याचं बोललं जातंय.
       Reply
       1. S
        SANDIP ANDHALE
        Oct 13, 2017 at 3:43 pm
        बोबडं पोपट आला का दांडिया खेळून ........तुझी लायकी काई बोलतो काय कळते का काही
        Reply
        1. M
         Mahesh
         Oct 13, 2017 at 3:41 pm
         उलटा चोर कोतवाल तो दाटे! LoL
         Reply
         1. S
          santosh jadhav
          Oct 13, 2017 at 3:37 pm
          किरीट सोमैया कामधंधा नाही.
          Reply
          1. S
           Sameer patil
           Oct 13, 2017 at 3:21 pm
           Kirit kirit abhi to chup Beit ja.bahut bakbak karta hai.ek bar tu akela election ladake dikha dekh tera kya hal hota hai..
           Reply
           1. Load More Comments