News Flash

३३ जिल्ह्य़ांमध्ये एसटी सेवा पूर्ववत

औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या सर्व विभागात मिळून ९४७ बस धावल्या.

संग्रहित छायाचित्र

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणारी एसटी सेवा सोमवारपासून राज्यातील ३३ जिल्ह्य़ांत सर्वसामान्यांसाठी सुरू झाली. तर सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्य़ांत मात्र एसटी सेवेसाठीचेही निर्बंध कायम आहेत.

राज्यात १ जूनपासून के वळ दीड हजार एसटी बसच अत्यावश्यक सेवांसाठी धावत होत्या. या बसच्या सहा हजार फे ऱ्यांमधून दररोज अडीच लाख प्रवासी प्रवास करत होते. त्यातून दररोज एक कोटी १५ लाख रुपये महसूल मिळत होता. सोमवारपासून एसटीची सेवा पूर्ववत झाली . ३३ जिल्ह्य़ांत एसटी प्रवाशांच्या सेवेत आली. सायंकाळी सहापर्यंत सुमारे चार हजार बसच्या २४ हजार फे ऱ्या झाल्या होत्या.

औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या सर्व विभागात मिळून ९४७ बस धावल्या. त्यापाठोपाठ नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगरमध्ये मिळून ८७५ बस, तर मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग या विभागात ५७७ बस चालवण्यात आल्या.

एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या एसटी फे ऱ्यांसाठी आगाऊ आरक्षण प्रणाली मंगळवार सकाळपासून कार्यरत होईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

२८३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

करोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या २८३ पर्यंत पोहोचली आहे. तर एकू ण बाधित कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार ६५४ पर्यंत पोहोचली असून ४२२ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. ७ हजार ९४७ कर्मचारी उपचार घेऊन पुन्हा रुजू झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 2:44 am

Web Title: st bus service resume in 33 districts of maharashtra zws 70
Next Stories
1 ‘एमएमआरसीएल’कडून मियावाकी पद्धतीने वृक्षांचे रोपण
2 आरेकडून वन विभागाला ८१२ एकर जागेचा ताबा
3 इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची एक हजार पेट्रोल पंपांवर निदर्शने
Just Now!
X