मराठी भाषा दिन म्हटले की फक्त एकच दिवस मराठी भाषेचे प्रेम उचंबळून येणे चुकीचे आहे. मराठी ही आपल्या रोमारोमांत भिनलेली भाषा आहे. माझी माती, माझी माता, माझी मातृभूमी.. माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा विषय. तो जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या एका ध्येयाने एक होऊन पुढे जाऊ या, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्र वारी व्यक्त केला.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने विधानमंडळातील वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, गेली कित्येक वर्षे आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत. केंद्रीय समितीपुढे हा विषय मान्यतेसाठी प्रलंबित आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाकारणारे जे कोणी आहेत त्यांना खडसावून सांगितले पाहिजे की, ही महाराष्ट्राची, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. ती नसती तर तुम्ही आज असता का? याचा विचार करा. माझ्या दृष्टीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी हा एकच पुरावा पुरेसा आहे, असेही त्यांनी सांगितले.

DD changes logo colours from red to orange
निवडणुकीच्या धामधुमीत दूरदर्शनची वृत्तवाहिनी भगवी
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक

‘‘इंग्रजी आली पाहिजे, आम्हाला दुसऱ्या भाषेचा दुस्वास करायचा नाही, पण त्यामुळे माझी भाषा कमकुवत होऊ नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला आज यानिमित्ताने लोकमान्य टिळकांचे ही स्मरण होते. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ असे विचारून इंग्रजांना हादरवणारा अग्रलेख त्यांनी लिहिला तोही मराठी भाषेतच. अनेकदा आजही आपण मराठीत बोलताना लाजतो. आपण किती उच्चभ्रू आहोत हे दाखवायला बघतो आणि इंग्रजीत बोलतो. समोरच्या व्यक्तीने फाडफाड इंग्रजीत बोलले की आपण कमी पडतो.’’ चीन, जपानमध्ये त्यांची भाषा ते ठामपणे आणि आत्मविश्वासाने बोलतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष त्यांचे दुभाषी सोबत घेऊन फिरतात. आपल्या मातृभाषेत बोलणे त्यांना कमीपणाचे वाटत नाही. आपल्यातला हा न्यूनगंड जात नाही तोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषाच नव्हे कुठलाच गौरव मिळणार नाही, असे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणाले..

* आपल्याला कारभारातील मराठी भाषा किती कळते, हेही पाहायला हवे. नस्तीवर सही झाली का, नियतव्यय म्हणजे काय, व्यपगत म्हणजे काय, किती शब्द माहिती आहेत आपल्याला, असा सवाल त्यांनी केला. मराठी भाषाकोश आपण साध्या सोप्या भाषेत करावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

* या वेळी विधान परिषेदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राज्यमंत्री विश्वजित कदम आदी उपस्थित होते.