पालिकेची पथके  लक्ष ठेवणार

मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या नवनवा उच्चांक गाठत असल्यामुळे पालिके ने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. लोकल गाडय़ांमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी खासगी कार्यालयांतील ५० टक्के उपस्थितीच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे पालिके ने ठरवले आहे. खासगी कार्यालयांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विशेष पथकावर सोपविण्यात आली आहे.

करोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळत असल्यामुळे पालिके ने मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने रुग्ण आढळूू लागले आहेत. बुधवारी पाच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. ही रुग्णवाढ अशीच पुढचे काही दिवस होत राहणार अशी शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त के ली आहे. मात्र मुंबईत सरसकट टाळेबंदी करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले आहे. लोकलमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी खासगी कार्यालयांना बंधनकारक असलेली ५० टक्के उपस्थिती अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे पालिके ने ठरवले आहे. टाळेबंदी शिथिल करताना पालिके ने घेतलेला हा निर्णय आजही लागू असून या निर्णयाची आता कठोर अंमलबजावणी के ली जाईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. कार्यालयांतील उपस्थितीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक प्रभागात तयार करण्यात आलेल्या पथकांवर देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची दैनंदिन उपस्थिती कमी झाल्यास लोकलमधील गर्दीही कमी होईल, असा विश्वास काकाणी यांनी व्यक्त के ला.

करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक प्रभागात पाच पथके तयार केली आहेत. या पथकांमार्फत आतापर्यंत विवाहसोहळे, बार, पब यांवर लक्ष ठेवले जात होते. मात्र, आता खासगी कार्यालयातही हे पथक लक्ष ठेवणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊनच काम करावे लागते त्यांनाच कार्यालयात बोलवावे, तसेच ज्यांना घरून काम करणे शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी, असेही कार्यालयांना सांगण्यात येणार आहे.

पालिकेच्या कार्यालयात १०० टक्के उपस्थिती

राज्य सरकारने आपल्या कार्यालयातील उपस्थिती कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना के ल्या आहेत. त्याप्रमाणे पालिके च्या कार्यालयातील उपस्थिती कमी करणार का असा सवाल विचारला असता काकाणी यांनी सांगितले की, पालिका अत्यावश्यक सेवा देत असते. त्यामुळे येथे १०० टक्के उपस्थिती आवश्यक आहे.