अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) शुक्रवारी रात्री अटक केली. चक्रवर्ती कुटुंबातील ही पहिलीच अटक आहे. NCB ने केलेल्या या कारवाईवर अभिनेता शेखर सुमन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता छोटा मासा गळाला लागला आहे, मोठा शार्क लवकरच जाळ्यात अडकला जाईल, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
यशाच्या दिशेने पहिलं पाऊल. आता लहान मासा गळाला लागला आहे. पण लवकरच मोठा शार्कदेखील पकडला जाईल. मला खात्री आहे त्या मोठ्या शार्कलादेखील लवकरच पकडण्यात येईल. इंडस्ट्री स्वच्छ करण्यात येत आहे, असं ट्विट शेखर सुमन यांनी केली आहे.
The first step toward success. congrats all of you.The small fish are https://t.co/8e6yFDmJz5 the time for the Big Sharks.i hope they are caught soon.The industry is cleaned up.The caucus is busted.The kingpins are arrested.Amen#ShowikChakrabortyarrested
— Shekhar Suman (@shekharsuman7) September 4, 2020
दरम्यान, सुशांतला न्याय मिळावा यासाठी शेखर सुमन हे सातत्याने सुशांतला पाठिंबा देत असल्याचं पाहायला मिळत आहे. यापूर्वीदेखील त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कलाविश्वातील घराणेशाही, गटबाजी यासारख्या मुद्द्यावर मत मांडलं आहे. त्यानंतर आता शोविकला अटक झाल्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. त्यांच्याप्रमाणेच कलाविश्वातील अनेकांनी याप्रकरणी समाधान व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.