सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात पोहोचली आहे. रियावर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप करण्यात आला असून त्या प्रकरणी तिची चौकशी करण्यात येणार आहे. ‘सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरूअसेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये’, अशी विनंती रियानं आपल्या वकिलांमार्फत केली होती. परंतु ईडीने ही विनंती फेटाळली. त्यामुळे रिया चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात पोहोचली.

सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला आहे. त्यामुळे याच प्रकरणी रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर ईडीने रियाला चौकशीसाठी समन्स बजावले होते. तसंच रियासोबत सुशांतची एक्स बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीचीदेखील चौकशी होणार आहे.

दरम्यान, रिया आणि श्रुतीनंतर सुशांतचा मित्र आणि त्याचा रुममेट सिद्धार्थ पिठानी याची शनिवारी (८ ऑगस्ट) चौकशी होणार आहे. बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने रिया विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यामुळे चौकशीसाठी आज रियाला ईडीसमोर हजर रहावं लागलं आहे.