24 October 2020

News Flash

रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीचा आज अखेरचा दिवस

रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीचा अखेरचा दिवस, १४ दिवसांपासून आहे तुरुंगात

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी आज (मंगळवार) पूर्ण होणार आहे. रियाला ड्रग्स सेवनासह इतर आरोपांखाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली होती. त्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी पूर्ण झाल्यानंतर रियाला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचा मुद्दा समोर आला होता. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला एनसीबीने अटक केली होती. ८ सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. आज रियाला न्यायालयात हजर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच जर या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, ड्रग्स सेवन आणि अन्य आरोपांखाली अटक झालेल्या रियाची भायखळा येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती. रियाला अटक झाल्यानंतर तिने दोन वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 9:36 am

Web Title: sushant singh rajput case rhea chakraborty judicial custody to end today in ssr drug connection case ssj 93
Next Stories
1 ९५०० इमारती प्रतिबंधित
2 पश्चिम रेल्वेकडून १५० फेऱ्यांची भर
3 स्टॉलधारकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर
Just Now!
X